ration-card-check: हा पुरावा आवश्यक अन्यथा रेशनकार्ड होणार बंद; राज्य शासनाचा आदेश

 ration-card-check: हा पुरावा आवश्यक अन्यथा रेशनकार्ड होणार बंद; राज्य शासनाचा आदेश

 ration-card-check: हा पुरावा आवश्यक अन्यथा रेशनकार्ड होणार बंद; राज्य शासनाचा आदेश

 

राज्यात अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे शिधापत्रिकांची पडताळणी मोहीम सुरू असून, यामध्ये अंत्योदय, केशरी आणि शुभ्र शिधापत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. ही मोहिम १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत सुरू राहणार आहे.

रहिवासाचा पुरावा बंधनकारक

शिधापत्रिकाधारकांना रहिवासाचा पुरावा द्यावा लागणार आहे. रहिवासाचा पुरावा न दिल्यास, पंधरा दिवसांच्या मुदतीत तो सादर करावा लागेल. जर दिलेल्या वेळेत पुरावा देऊ शकला नाही, तर संबंधित शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारने स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

पडताळणी मोहिमेचे उद्दिष्ट

या शोध मोहिमेत खालील बाबींवर लक्ष दिले जाणार आहे:
– एकाच पत्त्यावर दोन शिधापत्रिका असतील, तर त्या तपासल्या जाणार आहेत.
– कोणत्याही विदेशी नागरिकाला शिधापत्रिका दिली जाणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.
– केंद्र सरकार शिधापत्रिकाधारकांसाठी धान्य वितरणासाठी इष्टांक निश्चित करते. त्यामुळे नव्याने समाविष्ट होणाऱ्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी अपात्र लाभार्थ्यांची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे

रास्त भाव दुकानदारांकडून अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या अर्जासोबत शिधापत्रिकाधारकांना हमीपत्र आणि रहिवासाचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. ration-card-check

स्वीकारले जाणारे रहिवासाचे पुरावे:
– भाडेपावती
– निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा
– गॅस जोडणी क्रमांकाची पावती
– बँकेचे पासबुक
– विजेचे बिल
– फोन किंवा मोबाइल बिल
– वाहन परवाना
– कार्यालयीन किंवा अन्य ओळखपत्र
– मतदार ओळखपत्र
– आधार कार्ड

अर्जाची तपासणी आणि पुढील प्रक्रिया

– दुकानदारांनी हे अर्ज संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करायचे आहेत.
– क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अर्जाची तपासणी करून रहिवासाचा पुरावा दिलेल्यांची स्वतंत्र यादी तयार करावी.
– ज्या लाभार्थ्यांनी पुरावा दिला नाही, त्यांना तो १५ दिवसांच्या मुदतीत सादर करण्यास सांगितले जाईल.
– मुदतीत पुरावा न दिल्यास संबंधितांची शिधापत्रिका रद्द केली जाईल.
– एका पत्त्यावर दोन शिधापत्रिका असू शणार नाहीत. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत तहसीलदार किंवा तत्सम अधिकाऱ्यांकडून खातरजमा करून त्यास परवानगी दिली जाऊ शकते.
– एकाही विदेशी नागरिकाला शिधापत्रिका दिली जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.

राज्यात शिधापत्रिकांच्या पडताळणीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेद्वारे अपात्र लाभार्थ्यांची छाननी करून गरजूंना योग्य लाभ मिळावा, याची खात्री केली जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपली शिधापत्रिका सुरू ठेवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा करावीत. ration-card-check

हे पण वाचा : राज्यात किती शेतकऱ्यांनी आपली जमीन आधार नंबरला जोडली? जाणून घ्या सविस्तर!

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top