soybean seeds: मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले टॉप ५ सोयाबीन वाण: सविस्तर माहिती जाणून घ्या

soybean seeds: मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले टॉप ५ सोयाबीन वाण: सविस्तर माहिती जाणून घ्या

soybean seeds: मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले टॉप ५ सोयाबीन वाण: सविस्तर माहिती जाणून घ्या

 

soybean seeds: शेतकऱ्यांनो, खरीप हंगाम जवळ आला आहे आणि योग्य वाणांची निवड ही यशस्वी पीक उत्पादनाची पहिली पायरी आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी विकसित केलेले सोयाबीनचे पाच अत्यंत लोकप्रिय वाण आज आपण सविस्तर माहितीसह जाणून घेणार आहोत. यामध्ये वाणाचा कालावधी, लागवडीसाठी बियाण्याचे प्रमाण, उत्पादन क्षमता आणि प्रमुख वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

1️⃣ एमएयूएस-७२५ (MAUS-725)
• कालावधी (दिवस) : ९० ते ९५
• प्रति एकर बियाणे : २६ किलो
• सरासरी उत्पादन : १०.० ते १२.६ क्विंटल
• प्रमुख वैशिष्ट्ये :
– निमपसऱ्या आणि चिरके पानांचे वैशिष्ट्य
– शेंगांचे प्रमाण जास्त, २०-२५% शेंगा चार दाण्याच्या
– कीड व रोगांना मध्यम प्रतिकार
– कोरडवाहू परिस्थितीत अधिक उत्पादनक्षम

2️⃣ एमएयूएस-७१ (MAUS-71)
• कालावधी (दिवस) : ९३ ते ९६
• प्रति एकर बियाणे : २६ किलो
• सरासरी उत्पादन : ११.२ ते १२.० क्विंटल
• प्रमुख वैशिष्ट्ये :
– जांभळ्या फुलांसह टपोरे दाणे
– पक्वतेनंतर १०-१२ दिवस शेंगा न फुटता टिकतात
– आंतरपीकासाठी योग्य

3️⃣ एमएयूएस-१५८ (MAUS-158)
• कालावधी (दिवस) : ९५ ते ९८
• प्रति एकर बियाणे : २५ किलो
• सरासरी उत्पादन : १०.५ ते १२.५ क्विंटल
• प्रमुख वैशिष्ट्ये :
– जांभळ्या फुलांसह टपोरे दाणे
– पक्वतेनंतर शेंगा टिकणाऱ्या
– आंतरपीकासाठी अनुकूल
– खोडमाशीला सहनशील वाण

4️⃣ एमएयूएस-६१२ (MAUS-612)
• कालावधी (दिवस) : ९५ ते १००
• प्रति एकर बियाणे : २६ किलो
• सरासरी उत्पादन : १३.० ते १४.५ क्विंटल
• प्रमुख वैशिष्ट्ये :
– अधिक उत्पादन क्षमता
– चक्रीभुंगा, खोडमाशी आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीसह विविध किडींना सहनशील
– अल्टरनेरीया आणि शेंगा करपा यासारख्या रोगांपासून संरक्षण

5️⃣ एमएयूएस-१६२ (MAUS-162)
• कालावधी (दिवस) : १०० ते १०३
• प्रति एकर बियाणे : २६ किलो
• सरासरी उत्पादन : ११.२ ते १२.० क्विंटल
• प्रमुख वैशिष्ट्ये :
– यंत्राद्वारे काढणीस अनुकूल
– पक्वतेनंतर शेंगा १०-१२ दिवस न फुटता टिणाऱ्या

वरील सर्व वाण कोरडवाहू व सिंचित क्षेत्रासाठी उपयुक्त आहेत. जमिनीची गुणवत्ता, हवामानाची परिस्थिती व व्यवस्थापनाच्या पद्धतीनुसार योग्य वाणाची निवड केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते.soybean seeds

हे पण वाचा : मोसमी पावसाला पोषक वातावरण: पुढील ३-४ दिवसांत राज्यातील या भागांत मुसळधार पावसाचा इशारा

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top