meri-panchayat-app: गावात काय चाललंय, कसं चाललंय – आता सगळं समजेल एका क्लिकवर!

 meri-panchayat-app: गावात काय चाललंय, कसं चाललंय – आता सगळं समजेल एका क्लिकवर!

meri-panchayat-app: गावात काय चाललंय, कसं चाललंय – आता सगळं समजेल एका क्लिकवर!

 

meri-panchayat-app: डिजिटल युगात प्रत्येक गोष्ट स्मार्टफोनवर उपलब्ध झाली आहे. मग गावाचा कारभार मागे का राहावा? केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने ‘मेरी पंचायत’ हे अ‍ॅप आणून एक मोठं पाऊल टाकलं आहे. या अ‍ॅपमुळे ग्रामस्थांना आपल्या ग्रामपंचायतीच्या कारभाराची संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळणार आहे – तेही पारदर्शक आणि तात्काळ!

‘मेरी पंचायत’ अ‍ॅप म्हणजे काय?
‘मेरी पंचायत’ हे अ‍ॅप खास ग्रामपंचायतींच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने विकसित केलं आहे. यामुळे गावातील नागरीकांना त्यांच्या ग्रामपंचायतीत कोणती विकासकामं सुरू आहेत, कोणत्या योजना येत आहेत, निधी किती मिळतोय, याची थेट आणि स्पष्ट माहिती मिळेल.

अ‍ॅपवर मिळणारी महत्वाची माहिती:
• आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य कोण आहेत, किती सदस्य आहेत.
• स्थापन करण्यात आलेल्या समित्यांची माहिती व अध्यक्षांची नावे.
• नोटीस बोर्ड – ग्रामस्थांसाठी जारी सूचना व निर्णय.
• ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या शासनाच्या अनुदानाचा तपशील.
• विकासकामे कोणत्या योजनांतर्गत सुरू आहेत.
• बँक खाती किती आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून किती रक्कम खर्च केली गेली.
• गावात पाण्याचे स्रोत व नळ कनेक्शन किती आहेत.
• आर्थिक लेखाजोखा – निधी आला किती आणि गेला कुठे.

ग्रामस्थांना आपला अभिप्राय नोंदवण्याची संधी
‘मेरी पंचायत’ अ‍ॅपमधून गावातील कामांबाबत ग्रामस्थ आपली मते, सूचना, तक्रारी किंवा कौतुकही नोंदवू शकतात. तुम्ही एखाद्या कामात त्रुटी पाहिल्यास, त्या फोटोसह प्रशासनाच्या निदर्शनास आणू शता. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर जबाबदारीची जाणीव निर्माण होईल आणि विकासकामात पारदर्शकता येईल.

अ‍ॅपचे फायदे:
• ग्रामपंचायतीत वेळ वाया घालवायची गरज नाही.
• गावाचा हिशेब गावकऱ्यांना माहीत.
• अधिकाऱ्यांना थेट सूचना व तक्रारी पाठवण्याची सोय.
• पारदर्शक प्रशासन आणि जबाबदार कारभार.

गावाचा कारभार “माझा गाव – माझी जबाबदारी” या तत्त्वावर आधारित असावा, तर ‘मेरी पंचायत’ अ‍ॅप हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. गावातील प्रत्येक नागरिकाने हे अ‍ॅप वापरून आपल्या ग्रामपंचायतीच्या कारभारावर लक्ष ठेवावं, सूचना द्याव्यात आणि लोकशाहीच्या या डिजिटल माध्यमात सक्रीय सहभाग घ्यावा. meri-panchayat-app

हे पण वाचा : महाडीबीटी योजनेचा लाभार्थी तुमच्या गावात कोण? – जाणून घ्या सोपी पद्धत!

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top