महाराष्ट्राच्या ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ऐतिहासिक नोंद

महाराष्ट्राच्या ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

महाराष्ट्राच्या ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ऐतिहासिक नोंद

‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ महाराष्ट्राने सौरऊर्जा क्षेत्रात मोठी झेप घेत ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ उपक्रमाद्वारे जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. महावितरणने अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत तब्बल ४५,९११ सौर कृषिपंप बसवून नवीन विक्रम स्थापला असून या कामगिरीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाली आहे.

गिनीज रेकॉर्ड प्रमाणपत्राचा भव्य सोहळा

या यशाचा गौरव करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा MIDC परिसरातील औरिक सिटी मैदानावर विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.


योजनेची खास वैशिष्ट्ये — शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर

‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजना शेतकरी केंद्रित असून किफायतशीर अनुदान रचनेमुळे ती राज्यभर लोकप्रिय ठरत आहे:

  • शेतकऱ्यांचा वाटा : १०%
  • केंद्राचा वाटा : ३०%
  • राज्य सरकार अनुदान : ६०%
  • SC/ST शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा : फक्त ५%

यामुळे अल्प गुंतवणुकीत शेतकऱ्यांना संपूर्ण सौर पॅनेल व पंपाची सुविधा मिळते.


शेतकऱ्यांना मिळणारे थेट लाभ

  • सौर पॅनलमधून २५ वर्षांपर्यंत वीज निर्मिती, त्यामुळे विजेचे बिल लागत नाही.
  • दिवसा सिंचन करण्याची मुभा, कारण पंप पारंपरिक विजेवर अवलंबून नाही.
  • ‘पेंडिंग वीजजोडणी’ची समस्या दूर करण्यासाठी राज्यात दहा लाखांहून अधिक सौर पंप बसवण्याचे उद्दिष्ट.

हे पण वाचा २ डिसेंबर २०२५ कांदा बाजारभाव : महाराष्ट्रातील आजचे ताजे कांदा दर

 

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top