महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला; १५ जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा येलो अलर्ट

महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला

महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला; १५ जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा येलो अलर्ट

महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला:महाराष्ट्रात थंडीची लाट आणखी प्रखर झाली असून, भारतीय हवामान विभागाने राज्यातील १५ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. अनेक भागांत किमान तापमान अचानक घसरल्याने नागरिक आणि शेतकरी दोघांचीही गैरसोय वाढली आहे.


उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा मोठा घसरगुंडी

नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत थंडीने कमालीचा कहर केला असून, या चारही जिल्ह्यांसाठी अधिकृत येलो अलर्ट देण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातही तापमानात मोठी घसरण होत असून काही भागांमध्ये किमान तापमान १०°C च्या आसपास नोंदवले जाण्याची शक्यता वर्तवली आहे.


पुणे–पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला

पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून थंड हवामान कायम आहे. किमान तापमान ८.९°C इतके खाली आल्याची नोंद आहे.
हवामान विभागाचा अंदाज — पुढील २४ तासांत पुणे आणि आसपासच्या भागांत थंडीची तीव्रता आणखी वाढू शकते.


लोणावळा–मुळशी पट्टा तसेच घाट परिसरात हाडं गोठवणारी थंडी

लोणावळा, मुळशी, भोर घाट परिसरातही तापमानात स्पष्ट घसरण जाणवते आहे.
थंडीचा हा कडाका लक्षात घेता:

  • नागरिकांनी सकाळ–संध्याकाळ विशेष काळजी घ्यावी
  • वयोवृद्ध, लहान मुले आणि हृदयरुग्णांनी उबदार कपडे वापरावेत
  • शेतकऱ्यांनी थंडी-संवेदनशील पिकांसाठी संरक्षणात्मक उपाय करावेत

अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.

हे पण वाचा फळपीक विमा नोंदणीची अंतिम तारीख वाढली: आंबा–संत्रा–काजू शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top