gahu-sathavanuk-गव्हाची साठवणूक कशी कराल? या सोप्या ट्रिक्स वाचाच नाहीतर होईल नुकसान!

gahu-sathavanuk-गव्हाची साठवणूक कशी कराल? या सोप्या ट्रिक्स वाचाच नाहीतर होईल नुकसान!

gahu-sathavanuk-गव्हाची साठवणूक कशी कराल? या सोप्या ट्रिक्स वाचाच नाहीतर होईल नुकसान!

 

गहू दीर्घकाळ चांगल्या स्थितीत राहण्यासाठी योग्य साठवणूक अत्यंत महत्त्वाची आहे. साठवणुकीदरम्यान ओलावा, उंदीर, पक्षी आणि घाण यांपासून गव्हाचे संरक्षण करणे गरजेचे असते.

गव्हाची साठवणूक कशी करावी?
1. योग्य कोठाराची निवड:

• गव्हासाठी धातूच्या पत्र्याच्या किंवा सिमेंटच्या सुधारित कोठारांचा वापर करावा.
• अशा कोठारांमध्ये कीड, उंदीर आणि ओलाव्याचा त्रास मी होतो.
• गरज भासल्यास धान्याला विषारी वायूची धुरी देता येते.

2. पोत्यात गहू साठवताना:

• स्वच्छ आणि कोरड्या पोत्यांचा वापर करावा.
• पोती लाकडी फळ्या किंवा प्लास्टिकच्या चादरीवर ठेवावीत, जेणेकरून जमिनीतील ओलावा धान्याला नुकसान करू शकणार नाही.
• बाजारात मिळणाऱ्या पोत्याच्या आकाराच्या पॉलिथिन पिशव्या वापरल्यास गहू अधिक सुरक्षित राहतो.gahu-sathavanuk

गहू साठवताना घ्यायची काळजी:
1. किडींचे नियंत्रण:

• २० मि.ली. मेलिथिऑन (५०% प्रवाही) प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
• दर १०० चौरस मीटर जागेसाठी ३ मि.ली. मिश्रण वापरावे.
• ३० ग्रॅम प्रति क्विंटल प्रमाणात सेल्फॉस भुकटीचा बंद कोठारात वापर करावा.

2. उंदीर नियंत्रण:

• साठवलेल्या गव्हाला उंदरांपासून संरक्षण देण्यासाठी विषारी अमिषाचा वापर करावा.
• प्रत्यक्षात विषारी पदार्थ टाकण्याआधी २-३ दिवस भरडलेल्या धान्यात गोडेतेल मिसळून उंदरांना आकर्षित करावे.
• नंतर १ भाग झिंक फॉस्फाईड ५० भाग भरडलेले धान्य व गोडेतेल मिसळून अमिष तयार करावे आणि उंदरांपासून संरक्षण करावे.

3. बियाणे म्हणून गहू वापरणार असल्यास:

• साठवलेल्या गव्हाच्या प्रत्येक पोत्यात १ किलो वेखंड पावडर मिसळल्यास बियाणे चांगल्या स्थितीत राहते.

गव्हाची योग्य साठवणूक केल्यास त्याचे संरक्षण होते आणि नुकसान टाळता येते. वर दिलेल्या पद्धतींचा अवलंब केल्यास गहू जास्त काळ सुरक्षित राहील.gahu-sathavanuk

हे पण वाचा : भुईमूग पिकातील खोडकुज व मुळकुज रोग: प्रभावी व्यवस्थापन व नियंत्रण उपाय

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top