jivant-satbara-mohim: आजपासून राज्यात जिवंत सातबारा मोहीम – शेतकऱ्यांना काय फायदा?

jivant-satbara-mohim: आजपासून राज्यात जिवंत सातबारा मोहीम – शेतकऱ्यांना काय फायदा?

jivant-satbara-mohim: आजपासून राज्यात जिवंत सातबारा मोहीम – शेतकऱ्यांना काय फायदा?

 

काय आहे जिवंत सातबारा मोहीम?

मृत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी जिवंत सातबारा ही मोहीम राबविली जाणार आहे.jivant-satbara-mohim

महाराष्ट्र राज्यामध्ये जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत गावातील र्व मयत खातेदारांच्या वारसांच्या सातबारातील नोंदीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. या मोहिमेच्या माध्यमातून वारसांची नोंद अधिकृत अभिलेखांमध्ये करण्यास मदत होणार आहे.

कोणाला होणार लाभ?

मृत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही मोहीम अशा खातेदारांच्या वारसांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

ही कागदपत्रे लागणार

वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे:
– मृत्यू दाखला
– वारसाबाबत सत्यप्रतिज्ञालेख/स्वयंघोषणापत्र
– पोलिस पाटील/सरपंच/ग्रामसेवक यांचा दाखला
– सर्व वारसांची नावे, वय, पत्ते व दूरध्वनी क्रमांक/भ्रमणध्वनी क्रमांक
– रहिवासीबाबतचा पुरावा

ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे ही कागदपत्रे सादर करावी लागतील. तलाठी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्यामार्फत वारस ठराव ई-फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करतील.

कधीपासून राबविणार?

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’ १ एप्रिल २०२५ ते १० मे २०२५ पर्यंत राबविली जाणार आहे.

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना सूचना

– ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी ई-फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा.
– महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावा.jivant-satbara-mohim
– यामुळे सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंदविल्या जातील.

संपर्क कुठे कराल?

गावातील शेतकरी, जमीनमालक यांनी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याशी संपर्क करून आपल्या वारसांबाबतची नोंद अधिकार अभिलेखात करून घ्यावी. काही अडचण आल्यास मंडळ अधिकारी तसेच तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.

हे पण वाचा : ऑयस्टर मशरूम खा, निरोगी राहा! जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top