गहू भावात सुधारणा ; कापूस, सोयाबीनचा आजचा बाजारभाव काय?

गहू भावात सुधारणा ; कापूस, सोयाबीनचा आजचा बाजारभाव काय?

सोयाबीनमध्ये चढ उतार
आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात नरमाई आल्यानंतर आज सुधारणा दिसून आली. सोयापेंडच्या वायद्यांनी आज दुपारपर्यंत १० डॉलरचा टप्पा पार केला होता. तर सोयापेंडही ३१४ डॉलरवर पोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनमध्ये काहीसे चढ उतार दिसून येत आहेत. मात्र देशात भाव किमान पातळीवर स्थिर दिसत आहेत. आजही देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. सोयाबीनच्या भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस दबावातच
देशातील बाजारात कापसाची आवक शिगेला पोचलेली आहे. त्याचा दबाव बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा दिसून आलेली नाही. कापसाचा भाव आजही ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज शुक्रवारच्या तुलनेत दरात सुधारणा दिसून आली. आज दुपारपर्यंत दरपातळी ६८.२७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होती. शुक्रवारच्या तुलनेत भावपातळी जवळपास एक टक्क्याने अधिक होती. जानेवारीतही देशातील बाजारात कापसाची आवक चांगली राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरपातळीही स्थिर राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top