arthasankalp-2025: राज्य अर्थसंकल्प २०२५ – शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा

 arthasankalp-2025: राज्य अर्थसंकल्प २०२५ – शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा

 arthasankalp-2025: राज्य अर्थसंकल्प २०२५ – शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा

 

महाराष्ट्राच्या अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच २०२५ चा राज्य अर्थसंकल्प सादर केला. शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून कर्जमाफी, भावांतर योजना, नमो शेतकरी सन्मान निधी वाढीची मोठी अपेक्षा होती. मात्र सरकारने त्यांच्या आशा पूर्ण केल्या नाहीत, तरीही शेतीसाठी काही महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत.

शेतीसाठी महत्त्वाच्या घोषणा:

1. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० – २७ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करण्यासाठी नवी योजना.
2. “बळीराजा शेत व पाणंद रस्ते” योजना – बी-बियाणे, यंत्रसामग्री, खते आणि शेतमाल वाहतुकीसाठी नवीन योजना सुरू.
3. कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीसाठी – ५० हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्रासाठी दोन वर्षांसाठी ५०० कोटींचा निधी.
4. बांबू लागवड प्रकल्प – ४ हजार ३०० कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प, बांबू आधारित उद्योगांना चालना.
5. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या ४५ लाख कृषी पंपांसाठी मोफत वीज.
6. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान – दोन वर्षांसाठी २ लाख १३ हजार ६२५ लाभार्थी शेतकऱ्यांसाठी २५५ कोटींचा निधी.
7. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प – नगरपालिका क्षेत्रांतील सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी ८ हजार २०० कोटी रुपये मंजूर.
8. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम – कालवे वितरण प्रणाली सुधारण्यासाठी ५ हजार ३६ कोटी रुपये मंजूर.
9. जलयुक्त शिवार अभियान २.० – ५ हजार ८१८ गावांमध्ये ४ हजार २२७ कोटी रुपयांची १.४८ लाख कामे हाती घेतली जाणार.
10. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना – कायमस्वरूपी राबवली जाणार.
11. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प – टप्पा २ – २१ जिल्ह्यांतील ७ हजार २०१ गावांमध्ये ३५१ कोटी रुपये खर्च अपेक्षित.
12. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प – अंदाजित किंमत ८८ हजार ५७४ कोटी रुपये, ३.७१ लाख हेक्टर क्षेत्राला लाभ.
13. नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प – नाशिक व जळगाव जिल्ह्यात ४९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्रासाठी ७ हजार ५०० कोटींचा प्रकल्प.
14. दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प – २.३०० कोटी रुपये खर्च, ३.५५ टीएमसी पाणी उपलब्ध.
15. तापी महापुनर्भरण प्रकल्प – १९ हजार ३०० कोटींचा सिंचन प्रकल्प, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यासाठी उपयुक्त. arthasankalp-2025
16. कोकणातील उल्हास आणि वैतरणा नदीजोड प्रकल्प – ५४.७० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याची योजना, मराठवाड्यातील २.४ लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ.17. म्हैसाळ उपसा सिंचन योजना – सांगली जिल्ह्यात २०० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प, १ हजार ५९४ कोटी रुपयांना मान्यता.
18. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प – डिसेंबर २०२४ अखेर १२ हजार ३३२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण, पूर्णता जून २०२६ पर्यंत अपेक्षित.
19. उदंचन जलविद्युत प्रकल्प – ३८ प्रकल्पांसाठी सामंजस्य करार, २.९५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, ९० हजार रोजगार संधी.
20. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ – विविध कार्यक्रम, महोत्सवांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करणार.
21. मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन-स्मार्ट प्रकल्प – २१०० कोटी रुपये खर्च अपेक्षित. arthasankalp-2025
22. महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क-मॅग्नेट २.० – राज्यात शाश्वत व उच्च मूल्य कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी २१०० कोटी रुपये खर्च.

महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात शेती आणि सिंचन क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा झाल्या असल्या तरी शेतकऱ्यांची अपेक्षित कर्जमाफी किंवा अनुदान वाढ जाहीर झाली नाही. तरीही विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आता या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हे पण वाचा : बारमाही भाजीपाला शेतीसाठी भेंडी लागवड – एक फायदेशीर पर्याय!

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top