ई-पीक पाहणी ऑनलाइन चुकली? शेतकऱ्यांसाठी ऑफलाइन नोंदणीची अंतिम मुदत जाहीर

ई-पीक पाहणी ऑनलाइन चुकली?

ई-पीक पाहणी ऑनलाइन चुकली? शेतकऱ्यांसाठी ऑफलाइन नोंदणीची अंतिम मुदत जाहीर

खरीप हंगामातील ई-पीक पाहणी ऑनलाइन नोंद विविध कारणांमुळे न होऊ शकलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने मोठा दिलासा दिला आहे. अशा शेतकऱ्यांना आता २४ डिसेंबरपर्यंत ऑफलाइन पद्धतीने पीक पाहणी नोंद करण्याची संधी देण्यात आली आहे. ही संधी अत्यंत महत्त्वाची असून वेळेत अर्ज न केल्यास शासकीय मदतीपासून शेतकरी वंचित राहू शकतात.

कोणते शेतकरी ऑफलाइन ई-पीक पाहणीस पात्र आहेत?

खालील शेतकरी या ऑफलाइन नोंदणीस पात्र ठरतात:

  • ज्यांची खरीप २०२५ ई-पीक पाहणी ऑनलाइन नोंद झालेली नाही

  • मोबाईल ॲप, नेटवर्क किंवा तांत्रिक अडचणींमुळे नोंद अपूर्ण राहिलेली आहे

  • नैसर्गिक आपत्तीमुळे (पाऊस, पूर, वीज खंडित) नोंद करता न आलेले शेतकरी

  • ज्या जमिनीच्या सातबाऱ्यावर पीक नोंद दिसून येत नाही

ऑफलाइन ई-पीक पाहणीसाठी अर्ज कुठे करायचा?

शेतकऱ्यांनी आपल्या गावच्या तलाठी / ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन अर्ज सादर करायचा आहे.

  • अर्ज कालावधी: १७ डिसेंबर ते २४ डिसेंबर

  • २४ डिसेंबरनंतर अर्ज स्वीकारले जाण्याची शक्यता कमी आहे

ऑफलाइन ई-पीक पाहणी प्रक्रिया कशी राबवली जाणार?

  • गावस्तरीय समिती शेतात प्रत्यक्ष पाहणी करणार

  • पिकाची खातरजमा करून अधिकृत नोंद केली जाईल

  • प्रकरणे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे पाठव

हे पण वाचा महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम; पुढील काही दिवस गारठ्याचा त्रास सुरूच राहणार

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top