farmer id: राज्यात किती शेतकऱ्यांनी आपली जमीन आधार नंबरला जोडली? जाणून घ्या सविस्तर!

farmer id: राज्यात किती शेतकऱ्यांनी आपली जमीन आधार नंबरला जोडली? जाणून घ्या सविस्तर!

farmer id: राज्यात किती शेतकऱ्यांनी आपली जमीन आधार नंबरला जोडली? जाणून घ्या सविस्तर!

 

राज्यातील शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा आणि स्वतंत्र ओळख क्रमांक देण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला असून, आतापर्यंत राज्यातील ७५ टक्के लाभार्थ्यांना हा क्रमांक देण्यात आला आहे, अशी माहिती जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.farmer id

शेतकऱ्यांना थेट नोंदणी करण्याची संधी

राज्यात अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडे असलेल्या जमिनीला आधार क्रमांकाशी जोडून त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक देण्यात येत आहे. तलाठ्यांमार्फत नोंदणी प्रक्रिया सुरू असून, शेतकरी सामायिक सुविधा केंद्रांमधूनही आपला ओळख क्रमांक प्राप्त करू शकतात. पुढील टप्प्यात, शेतकऱ्यांना स्वतः पोर्टलवर जाऊन नोंदणीरता येईल. यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ होणार आहे.

योजनेची आतापर्यंतची प्रगती

राज्यभरात २१,७०,४१८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
यापैकी २१,६८,६३२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे.
पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये ७५ टक्के शेतकऱ्यांनी हा क्रमांक मिळवला आहे.

जिल्हानिहाय प्रगती: अहिल्यानगर आघाडीवर

अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक ६,०१,१६१ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. याच जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे सर्वाधिक ७,११,५५२ लाभार्थी आहेत.

विभागनिहाय ओळख क्रमांक वाटप

पुणे – २१,७१,०९०
नाशिक – १७,८५,४५४
संभाजीनगर – २२,९७,५८२
अमरावती – १२,७७,८९४
नागपूर – ११,३४,०७६
कोकण – ५,०२,२२०
मुंबई – ३२३
एकूण – ९९,६८,६३९

शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकीचा पुरावा व ओळख क्रमांक देण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजना महत्त्वाची ठरत आहे. पुढील टप्प्यात शेतकऱ्यांना थेट नोंदणी करण्याची संधी देण्यात येणार असून, त्यामुळे अधिक शेतकऱ्यांचा या योजनेत सहभाग वाढेल. शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना योजनांचा लाभ सहज मिळू शकणार आहे.farmer id

हे पण वाचा : फेडरेशनची खरेदी बंद होताच उडीद बाजारभावात मोठी वाढ; सध्याचा दर किती?

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top