farmer-id: आता घरबसल्या मोबाईलवर काढा तुमचा फार्मर आयडी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!
farmer-id: अग्रिस्टॅक (AgriStack) योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या शेतासाठी एकत्रित माहिती संच तयार करण्यात येत आहे.
या अंतर्गत खालील माहिती संकलित केली जात आहे:
• शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (Farmer Registry)
• शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (Crop Sown Registry)
• भू संदर्भित शेतांचे नकाशे (Geo-Referenced Land Parcel)
या संपूर्ण प्रक्रियेतून शेतकऱ्यांना त्यांचा स्वतःचा शेतकरी ओळख क्रमांक (farmer-id) दिला जात आहे.
ही ओळख भविष्यात कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यावश्यक असेल.
१५ एप्रिल २०२५ पासून Farmer ID शिवाय शेतकऱ्यांना कोणताही योजना लाभ मिळणार नाही.
आता घरबसल्या मोबाईलवरच बनवा तुमचा Farmer ID!
तुम्हाला कुठल्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही मोबाईलवरच नोंदणी करू शकता.
Farmer Self Registration करण्याची प्रक्रिया:
1. खालील लिंकवर क्लिक करा:
👉 https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/
2. लिंक ओपन झाल्यानंतर “Farmer” यावर क्लिक करा.
3. नंतर “Create New User Account” निवडा.
4. तुमचा आधार क्रमांक वापरून E-KYC पूर्ण करा.
5. Submit बटन क्लिक करा.
6. आधार लिंक मोबाईलवर आलेला OTP टाका.
7. Verify क्लिक करा.
8. शेतकऱ्याची माहिती स्क्रीनवर दिसेल.
येथे Agristack Portal साठी नवीन मोबाईल नंबर टाकायचा (जर बदलायचा असेल तर).
9. नवीन मोबाईलवर आलेला OTP टाका व Verification करा.
A10. gristack Profile साठी Password सेट करा.
11. Set Password आणि Confirm Password भरून
Create My Account क्लिक करा.
12. यानंतर तुमचे Registration पूर्ण होईल आणि Profile तयार होईल.
13. OK वर क्लिक करा.
14. नंतर लॉगिन पेज येईल.
Username म्हणून मोबाईल नंबर टाका आणि लॉगिन करा.
15. लॉगिन केल्यावर “Register as Farmer” वर क्लिक करा.
16. मोबाईल नंबर बदलायचा नसेल तर Mobile Confirmation (No) वर क्लिक करा.
17. आता Farmer ID Form ओपन होईल.
18. Farmer Details मध्ये तुमचे पूर्ण नाव आणि इतर माहिती भरा.
हे पण वाचा : ई-नाम योजनेत सहभागी होण्यासाठी ‘हे’ झाले बंधनकारक – सविस्तर माहिती वाचा