free electricity: राज्यातील ८०% शेतकऱ्यांना वर्षभर १२ तास मोफत वीज – शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक घोषणा

free electricity: राज्यातील ८०% शेतकऱ्यांना वर्षभर १२ तास मोफत वीज – शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक घोषणा

free electricity: राज्यातील ८०% शेतकऱ्यांना वर्षभर १२ तास मोफत वीज – शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक घोषणा

 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, डिसेंबर २०२६ पर्यंत ८० टक्के शेतकऱ्यांना वर्षभर, दिवसाला १२ तास मोफत वीज पुरवठा करण्यात येईल. ही घोषणा आर्वी, वर्धा येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी करण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, येत्या पाच वर्षांमध्ये राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे वीज बील दरवर्षी कमी केले जाणार आहे. तसेच, ३०० युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज दिली जाईल.

वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचे उपक्रम:

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी ७२० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे ई-लोकार्पण व भूमिपूजन झाले. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अमर काळे, आमदार दादाराव केचे व इतर मान्यवर उपस्थित होते.free electricity

सिंचन आणि पायाभूत सुविधा:

मुख्यमंत्री म्हणाले की, वर्धा जिल्ह्यात लोअर वर्धा, वाढोणा-पिंपळखुटा यासारख्या सिंचन प्रकल्पांद्वारे शेतीसाठी पाणी व वीज उपलब्ध करून दिली जाईल. तसेच, समृद्धी महामार्गावरील नोडवर एमआयडीसी उभारण्यात येईल, ज्यामुळे जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.

महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्प:

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, या योजनेमुळे वर्ध्यासह विदर्भातील दहा जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांना कायमस्वरूपी सिंचनाचा लाभ होणार आहे. गोसीखुर्द धरणातून ६२ टीएमसी पाणी सांडव्याद्वारे ५५० किमी लांबीची नवीन नदी तयार केली जाणार आहे. यासाठी १ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून सर्व आवश्यक मंजुरी प्राप्त झालेली आहे. योजनेचे प्रत्यक्ष काम यावर्षी अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीस सुरू होणार आहे.free electricity

मुख्यमंत्री फडणवी यांच्या घोषणांमुळे राज्यातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार असून, सिंचन, वीज, आणि औद्योगिक विकासाच्या माध्यमातून वर्धा आणि आसपासच्या भागाचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे.

हे पण वाचा : हा पुरावा आवश्यक अन्यथा रेशनकार्ड होणार बंद; राज्य शासनाचा आदेश

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top