halad-biyane-sathavan: हळदीच्या बियांना जास्त काळ टिकवण्यासाठी प्रभावी साठवण उपाय! वाचा सविस्तर

halad-biyane-sathavan: हळदीच्या बियांना जास्त काळ टिकवण्यासाठी प्रभावी साठवण उपाय! वाचा सविस्तर

halad-biyane-sathavan: हळदीच्या बियांना जास्त काळ टिकवण्यासाठी प्रभावी साठवण उपाय! वाचा सविस्तर

 

हळद पिकाच्या काढणीचा हंगाम आणि प्राथमिक प्रक्रिया
सध्या हळद पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. खांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापवावेत. कंद तापल्याने त्यास पाणी सुटते आणि चिकटलेली माती सहज निघून जाते. दोन दिवसांनी कंदाची मोडणी करावी.

हळद बेण्याची साठवणूक करताना घ्यावयाची काळजी
– हळद काढल्यानंतर पुढील हंगामासाठी वापरण्यासाठी योग्य बियाणे निवडून बाजूला ठेवावेत.
– किडग्रस्त, रोगयुक्त किंवा अर्धवट कुजलेले गड्डे साठवणीसाठी निवडू नयेत.

साठवणुकीसाठी महत्त्वाचे उपाय
१. योग्य साठवणुकीची जागा:
– साठवणीची जागा सावलीत वारा खेळेल अशा ठिकाणी असावी.
– बियाणे थोड्या उंचवट्यावर कोणाकार ढीग करून रचावे.
– त्यावर हळदीच्या पानांचा १० ते १५ सेंमी. थर द्यावा व त्यावर कीटकनाशक व बुरशीनाशक फवारणी करावी.
– पाला उन्हात सुकवून वापरावा आणि त्यावर गोणपाट टाकून आवश्यक तेवढे पाणी मारावे.

२. साठवणीचा कालावधी:
– साठवणीचा कालावधी ७५ ते ९० दिवसांपर्यंत ठेवल्यास सर्व बेण्यांचे डोळे फुगलेले दिसतात.
– सुरुवातीस ४५ ते ६० दिवस कोणतीही प्रक्रिया करू नये.
– लागवडीच्या ३० दिवस अगोदर ६ ते ८ दिवसांच्या अंतराने ढिगावर पाणी मारावे.
– या पद्धतीमुळे गड्ड्यावर असणाऱ्या मूळ्या लवकर कुजतात आणि त्यांची वेगळ्या गड्ड्यांपासून त्वरित छाटणी रता येते. असे मुळ्याविरहीत गड्डे बेणे लागवडीसाठी उत्तम समजले जातात.halad-biyane-sathavan

जमिनीत खड्डा करून बियाणे साठवण्याची पद्ध
– ज्या ठिकाणी तापमान ४०° सें. पेक्षा जास्त जाते तिथे ही पद्धत उपयोगी ठरते.
– ज्या ठिकाणी जमिनीतील पाण्याची पातळी १ मीटरपेक्षा खोल आहे आणि ती जागा उंच आहे, अशा सावलीच्या ठिकाणी १ मीटर खोलीचा खड्डा तयार करावा.
– खड्ड्याच्या तळाला ढाळ/उतार द्यावा.
– तळाशी ३ ते ४ इंच जाडीच्या विटांच्या तुकड्यांचा थर द्यावा, त्यावर बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची धुरळणी करावी.
– त्यानंतर निर्जंतुक केलेल्या पाल्याचा ६ ते ८ इंच जाडीचा थर द्यावा.
– खड्ड्याच्या बाजूनेही तेवढ्याच जाडीचा पाल्याचा थर द्यावा.
– बेण्याचा १ फूट उंचीचा थर झाला की पुन्हा कीटकनाशक, बुरशीनाशक धुरळावे.
– खड्डा ३ फूट उंचीचा भरावा आणि त्यावर निर्जंतुक केलेल्या पाल्याचा थर द्यावा.
– खड्ड्यात १ मीटर अंतरावर छिद्र असलेले अडीच ते तीन इंच व्यासाचे पीव्हीसी पाईप टाकावेत.
– नंतर खड्डा गोणपाटाने झाकावा आणि पावसाळ्यात ते प्लास्टिक कागदाने झाकावे.

या पद्धतीने हळदीचे बेणे योग्य प्रकारे साठवून त्याचा उत्पादनक्षम वापर करता येतो. योग्य साठवणुकीमुळे बेण्याची गुणवत्ता राखली जाते आणि पुढील हंगामासाठी चांगली हळद लागवड करता येते.halad-biyane-sathavan

हे पण वाचा : अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान; बाजारभाव वाढण्याची शक्यता?

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top