जनसमर्थ पोर्टलवरून घरबसल्या पीक कर्ज
किसान क्रेडिट कार्डद्वारे 2 लाख रुपयांपर्यंत ऑनलाइन अर्ज
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी सुविधा सुरू झाली आहे. आता केंद्र सरकारच्या जनसमर्थ (Jansamarth) पोर्टलवरून शेतकरी घरबसल्या किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत पीक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या माध्यमातून जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जनसमर्थ पोर्टल म्हणजे काय?
जनसमर्थ हे केंद्र सरकारचे डिजिटल वित्तीय पोर्टल असून, येथे विविध शासकीय कर्ज योजना आणि वित्तीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याच पोर्टलवरून आता राष्ट्रीयीकृत बँकांच्या पीक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत.
कर्जाची मर्यादा व प्रकार
-
कर्ज प्रकार: पीक कर्ज (KCC अंतर्गत)
-
कमाल मर्यादा: ₹2,00,000
-
बँका: राष्ट्रीयीकृत बँका
-
प्रक्रिया: पूर्णपणे ऑनलाइन व मोफत
अर्जासाठी लागणारी कागदपत्रे
-
शेतकरी आयडी (Farmer ID) – अनिवार्य
-
आधार कार्ड
-
आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर
-
बँक पासबुक
-
पॅन कार्ड
टीप: Farmer ID नसल्यास आधी तयार करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांना होणारे फायदे
-
बँकेत फेऱ्या मारण्याची गरज नाही
-
घरबसल्या अर्ज व कागदपत्र अपलोड
-
कोणतेही शासकीय शुल्क नाही
-
पात्र अर्जदारांचे कर्ज जलद मंजूर होण्यास मदत
अर्ज कुठे करता येईल?
-
जनसमर्थ पोर्टल (स्वतः ऑनलाइन)
-
सेतू केंद्र
-
महा ई-सेवा केंद्र
-
ग्राहक सेवा केंद्र (CSC)
सर्व ठिकाणी अर्ज प्रक्रिया मोफत आहे.
फसवणुकीपासून सावध रहा
-
अर्जासाठी कोणीही पैसे मागू नये
-
पैसे मागितल्यास जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करावी
हे पण वाचा कांदा चाळ व लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी 50 टक्के अनुदान











