उन्हाळ्यात फायद्याचे कारले पीक… अधिक उत्पादन कसे मिळवाल?

उन्हाळ्यात फायद्याचे कारले पीक… अधिक उत्पादन कसे मिळवाल?

उन्हाळ्यात फायद्याचे कारले पीक… अधिक उत्पादन कसे मिळवाल?

 

चवीला कडू असल्यामुळे कारल्याच्या भाजीला नाक मुरडले जाते. अत्यंत कडू असले तरी त्यातील कर्बोदके, प्रथिने, खनिजे, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आवर्जून कारल्याची भाजी खाल्ली जाते. त्यामुळे कारल्यासाठी बाजारात चांगली मागणी आहे.
खरीप, तसेच उन्हाळी हंगामात कारल्याची लागवड करण्यात येते. उष्ण व दमट हंगामातील पीक असून, कडाक्याच्या थंडीचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो.

आवश्यक हवामान
फुले आणि वाढीसाठी २५-३० अंश सेल्सिअस तापमान फायदेशीर ठरते. कमी तापमान आणि जास्त पाऊस असलेल्या भागातही लागवड करता येते. ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात मादी फुले, फळधारणा आणि झाडाच्या वाढीवर परिणाम होतो. विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.

लागवडीचा हंगाम
उन्हाळी हंगाम जानेवारी ते मार्च, तर जास्त थंडी असल्यास फेब्रुवारी महिन्यात लागवड करावी. खरीप हंगामात जून-जुलैमध्ये लागवड करावी.

लागवडासाण वाण
कारले लागवडीसाठी काही सुधारित जातींची शिफारस करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले ‘कोकण तारा’ हे वाण चांगले पीक देणारे आहे.

लागवड कशी करावी?
– लागवडीसाठी दोन ओळींतील अंतर ३.५ ते ५ फूट आणि दोन वेलींतील अंतर २-३ फूट ठेवावे.
– लागवड साधारणपणे बियाणे टोकन पद्धतीने केली जाते.
– थंड हवामानात उगवण क्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याने हरितगृहामध्ये रोपवाटिका केल्यास अधिक फायदेशीर ठरते.
– अशा रोपांची पुनर्लागवड करावी. ऊबदार जमिनीत बियाणे टोकन पद्धतीने लावल्यास ६-७ दिवसांत उगवून येतात.
– कारले लागवडीसाठी हेक्टरी १.५ ते २ किलो बियाणे लागते.

पाणी व खत व्यवस्थापन
– वेलवर्गीय पीक असून, कमी किंवा जास्त पाण्याचा ताण सहन होत नाही.
– फळधारणा अवस्थेत २-५ दिवसांनी गरजेनुसार पाणी दिल्याने उत्पादनामध्ये वाढ होते.
– प्रति हेक्टरी कुजलेले शेणखत २० टन वापरावे.
– तसेच नत्र, स्फुरद, पालाश खते प्रमाणात वापरावीत.
– मिश्र खतांचा वापर उत्पादन वाढीसाठी फायदेशीर ठरतो.

आंतरमशागतीची कामे
– लागवडीनंतर १५-२० दिवसांच्या अंतराने खुरपणी करून वेली भोवतीची तणे काढून घ्यावी.
– कारली हे वेलवर्गीय पीक असून, वेलींना आधार दिल्यास त्यांची वाढ चांगली होते.
– नवीन फुटीच्या वाढीला चांगला वाव मिळतो.

कीड-रोग व्यवस्थापन
– कारले पिकावर प्रामुख्याने भुरी, केवडा रोग तसेच तांबडे भुंगेरे, फळमाशी, मावा, पांढरी माशी तसेच पाने-फळ पोखरणारी अळी आणि पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव होतो.
– किडीच्या बंदोबस्तासाठी पिवळे निळे चिकट सापळे लावावे.
– लागवडीपासून ६०-७५ दिवसांत कारली काढणीसाठी तयार होतात.
– चवीला कडू असले तरी त्यातील गुणधर्मामुळे वाढती मागणी होत आहे.

हे पण वाचा : रताळे: हिवाळ्यातील पौष्टिक सुपरफूड, त्याचे फायदे आणि गुपित काय?

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top