keli-til-lagvad: केळीबरोबर तिळाची आंतरपीक लागवड करा आणि उत्पन्नात वाढ करा!

keli-til-lagvad: केळीबरोबर तिळाची आंतरपीक लागवड करा आणि उत्पन्नात वाढ करा!

keli-til-lagvad: केळीबरोबर तिळाची आंतरपीक लागवड करा आणि उत्पन्नात वाढ करा!

 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची शिफारस
उन्हाळी हंगामासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने (Krushi Vidyapith Rahuri) विकसित केलेल्या “फुले पूर्णा” या तिळाच्या जातीचे बियाणे 1000 एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर यशस्वीरीत्या फुलले आहे. काही शेतकऱ्यांनी केळी पिकात आंतरपीक म्हणून तिळाची लागवड केली असून काहींनी कापून गेलेल्या केळीच्या खोडव्यामध्ये तीळ पिकाची लागवड केली आहे.keli-til-lagvad

केळी आणि तीळ आंतरपीक लागवडीचा यशस्वी प्रयोग
धुळे जिल्ह्यातील पिंपरी येथील शेतकरी राजेंद्र देवसिंग राजपूत यांनी तीन एकर क्षेत्रावर केळी लागवड केली असून त्यासोबत तिळाची लागवड केली आहे. त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने तीळ लागवड रून अधिक उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

तिळावर बीजप्रक्रिया व पेरणी प्रक्रिया
बीज प्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा पावडर आणि पीएसबी कल्चरचा वापर केला गेला आहे. पेरणीसाठी बैलपांबरीचा उपयोग करून योग्य अंतरावर पेरणी केली आहे. बियाणे अडीच ते तीन सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलवर जाऊ नये याची विशेष काळजी घेतली आहे.

खत व्यवस्थापन
प्रति हेक्टर ५ टन शेणखत, १ टन एरंडी पेंड आणि १० किलो सल्फर मिसळले.
नत्र ६० किलो, स्फुरद ४० किलो आणि पोटॅश २० किलो प्रति हेक्टर प्रमाणे खत व्यवस्थापन.
दोन टक्के युरियाची फवारणी अधिक उत्पादनासाठी केली.

तण आणि पाणी व्यवस्थापन
३५-४० दिवसाच्या कालावधीत तण नियंत्रणासाठी निंदणी आणि कोळपणी केली.
तीळ पीक संवेदनशील असल्याने १२-१५ दिवसांच्या अंतराने पाणी दिले.
फुलोऱ्याच्या टप्प्यावर पाणी व्यवस्थापनात विशेष काळजी घेतली.

पीक संरक्षण व रोग नियंत्रण
पाने गुंडाळणारी अळी, गादमाशी, रस शोषणाऱ्या कीटकांसाठी निंबोळी अर्क आणि Quinalphos चा वापर.
पर्णगुच्छ, मर, खोड व मुळकुज आणि भुरी रोग टाळण्यासाठी योग्य उपाययोजना.

आंतरपीक लागवडीचे फायदे
केळीच्या उन्हाळी लागवडीत व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तिळाची आंतरपीक म्हणून लागवड उपयुक्त ठरते. तिळाच्या मुळाजवळ नैसर्गिकरित्या तयार होणारा विशिष्ट प्रकारचा वायू केळी पिकासाठी हानिकारक असलेल्या सूत्रकृमींना नष्ट करतो. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते आणि उत्पादन वाढते.keli-til-lagvad

केळी पिकात आंतरपीक म्हणून तिळाची लागवड करणे फायदेशीर ठरत आहे. या पद्धतीने उत्पादन वाढते, जमिनीचे आरोग्य सुधारते आणि नफा अधिक मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे फायदेशीर ठरेल.

हे पण वाचा : शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज; काय आहे नवीन योजना?

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top