krushi-salla: उन्हाळी भुईमूग पिकांसह फळबागांचे असे करा व्यवस्थापन; वाचा कृषी सल्ला सविस्तर

krushi-salla: उन्हाळी भुईमूग पिकांसह फळबागांचे असे करा व्यवस्थापन; वाचा कृषी सल्ला सविस्तर

krushi-salla: उन्हाळी भुईमूग पिकांसह फळबागांचे असे करा व्यवस्थापन; वाचा कृषी सल्ला सविस्तर

 

krushi-salla: अलीकडील दिवसांत मराठवाड्यात हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी पडल्या असून, सध्या अनेक भागांत ढगाळ हवामान अनुभवले जात आहे. या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित पीक सल्ला जारी केला आहे.

हवामानाचा अंदाज:
– १७ एप्रिल: बीड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता.
– १८ एप्रिल: संभाजीनगर, जालना, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत पावसाची शक्यता.
– १९ एप्रिल: जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूरमध्ये उष्ण आणि दमट हवामान.
– पुढील ४–५ दिवसांत कमाल तापमान २–३ अंशांनी वाढण्याची शक्यता.

शेतकऱ्यांसाठी सल्ला:

हळद:
– काढणीस तयार असलेली हळद काढून उकडणे, वाळवणे आणि पॉलिश करून सुरक्षित साठवणूक करावी.

उन्हाळी भुईमूग:
– तुषार सिंचनाचा वापर करावा.
– रसशोषक किडींसाठी एकरी १०–१२ चिकट सापळे लावावेत.
– अंडी व अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.
– ५% निंबोळी अर्क किंवा अॅझाडिरेक्टिनची फवारणी करावी.

केळी:
– घडांना आधार द्यावा.
– पाणी व्यवस्थापन व आच्छादन करावे.
– नविन लागवड रोपांना सावली द्यावी.

आंबा:
– काढणीस तयार फळांची काढणी करावी.
– पाणी व्यवस्थापन व आच्छादन करावे.
– नविन लागवडीस सावली द्यावी.

द्राक्ष:
– काढणीस तयार फळांची काढणी करावी.
– एप्रिल छाटणीची तयारी करावी.

भाजीपाला:
– तयार भाजीपाला काढणी करून विक्री करावा.
– तण नियंत्रण व पाणी व्यवस्थापन करावे.
– रसशोषक किडींवर फवारणी करावी.

फुलशेती:
– फुलांची काढणी करून बाजारात पाठवावी.
– तण नियंत्रण रावे.

हवामानातील बदल लक्षात घेऊन योग्य वेळी पीक संरक्षण आणि व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या शिफारशींचे पालन केल्यास उत्पादनात वाढ आणि नुकसान टाळता येईल.krushi-salla

हे पण वाचा : चिया पिकाची निवड का करावी? जाणून घ्या फायदे आणि महत्व सविस्तर!

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top