mahadbt-labharthi-yadi: महाडीबीटी पोर्टलवर कृषी योजनांची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा

mahadbt-labharthi-yadi: महाडीबीटी पोर्टलवर कृषी योजनांची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा

mahadbt-labharthi-yadi: महाडीबीटी पोर्टलवर कृषी योजनांची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा

 

राज्य शासनासह केंद्र शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध कृषी योजना महाडीबीटी (Mahadbt Farmer Portal) पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. या पोर्टलवर अर्ज करणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुदान राज्य शासनाकडून थेट त्यांच्या खात्यावर वितरित केले जात आहे.mahadbt-labharthi-yadi

शेतकऱ्यांचे सामान्य प्रश्न
अनेक वेळा गावांमध्ये शंका व्यक्त केली जाते की योजनांचा लाभ काहींनाच मिळतो, काहीजण पात्र ठरूनही अनुदान मिळत नाही किंवा गावातील कोणालाही काहीही माहिती मिळत नाही. अशा परिस्थितीत, आपण ऑनलाइन पोर्टलवरून थेट आपल्या गावातील लाभार्थी यादी पाहू शकतो.

ऑनलाइन यादी पाहण्याची पद्धत
1. महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करा – सर्वप्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर जा आणि आपला युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करा.

2. डाव्या बाजूच्या मेनूमध्ये हे पर्याय दिसतील:

• अर्जाची सद्यस्थिती तपासा

• लॉटरी यादी

• निधी वितरित लाभार्थी यादी

3. “निधी वितरित लाभार्थी यादी” वर क्लिक करा.
इथे आपण त्या शेतकऱ्यांची यादी पाहू शकता ज्यांना अनुदान वितरित झाले आहे.

4. पुढील टप्पे:

• जिल्हा निवडा

• तालुका निवडा

• गाव निवडा

ही माहिती भरल्यानंतर आपल्याला त्या गावातील लाभार्थ्यांची यादी दिसेल.

5. अधिक माहिती मिळवा:

• लाभार्थ्यांचे नाव

• कोणत्या योजनेसाठी लाभ मिळाला

• कोणत्या दिवशी अनुदान खात्यात जमा झाले

• 2024-25 या आर्थिक वर्षातील यादीसह मागील वर्षांचीही माहिती उपलब्ध

महाडीबीटी पोर्टल हे पारदर्शकतेचा एक चांगला नमुना आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून किंवा संगणकावरून आपल्या नावाचा आणि गावातील इतर पात्र लाभार्थ्यांचा तपशील पाहता येतो. त्यामुळे आता “माझं अनुदान आलं का?” याचा शोध घेण्यासाठी कोणाकडे विचारायची गरज नाही. माहिती आपल्या बोटांच्या टोकावर आहे – फक्त वापरणे आवश्यक आहे.mahadbt-labharthi-yadi

हे पण वाचा : राज्यातील ८०% शेतकऱ्यांना वर्षभर १२ तास मोफत वीज – शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक घोषणा

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top