mahadbt-yojana: महाडीबीटीच्या सर्व योजना उघड! कोणती योजना तुमच्यासाठी आहे? इथे पहा सविस्तर यादी!

mahadbt-yojana: महाडीबीटीच्या सर्व योजना उघड! कोणती योजना तुमच्यासाठी आहे? इथे पहा सविस्तर यादी!

mahadbt-yojana: महाडीबीटीच्या सर्व योजना उघड! कोणती योजना तुमच्यासाठी आहे? इथे पहा सविस्तर यादी!

 

mahadbt-yojana: शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे, खर्च कमी करणे, आणि आधुनिक शेतीस प्रोत्साहन देणे या हेतूने महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी पोर्टल (Mahadbt Portal) सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी तसेच शेतकरी गटांसाठी अनेक योजना राबविल्या जातात.

या ब्लॉगमध्ये आपण महाडीबीटीवरून मिळणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती घेणार आहोत, ज्याचा लाभ आपण आपल्या शेतीसाठी घेऊ शकता.

🔹 अ) वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी योजना
1) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM)
लाभ:

• पिकांनुसार सिंचन साधने व यंत्रसामग्री
• उदाहरण: इलेक्ट्रिक मोटार, डिझेल इंजिन, PVC पाईप, पेरणी यंत्र, बीबीएफ पेरणी यंत्र, मळणी यंत्र
• बियाणे, पीक संरक्षण औषधे, सूक्ष्ममूलद्रव्ये इत्यादी

2) कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान (Farm Mechanization Sub-Mission)
लाभ:

• विविध कृषी यंत्रांसाठी अनुदान
• ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, रोटाव्हेटर इत्यादी

3) राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना

4) राष्ट्रीय कृषी विकास योजनेत कृषी यांत्रिकीकरण

सामान्य लाभ:

• रोटाव्हेटर, ट्रॅक्टर, नांगर, स्प्रेअर्स, रिपर यांसारखी यंत्रे

5) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
लाभ:

• हरितगृह, शेडनेट, कांदाचाळ, प्लॅस्टिक मल्चिंग
• पीक संरक्षण उपकरणे, रेफर व्हॅन, शीतगृह
• जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, नर्सरी

6) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY)
लाभ:

• ठिबक आणि तुषार सिंचन प्रणाली
• रिव्हर्स PTO, मजबूत टायरसह सिंचन साधने

7) अनुसूचित जाती/जमाती शेतकऱ्यांसाठी योजना
• विशेषत: सामाजिक दुर्बल घटकांसाठी योजना

8) बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
9) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
लाभ:

• विहीर बांधकाम व दुरुस्ती
• पंप संच, वीज जोडणी
• सूक्ष्म सिंचन, सोलर पंप, शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण

🔹 ब) शेतकरी गट / कंपनी / संस्था यांच्यासाठी योजना
1) कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान (औजारे बँक स्थापना)
लाभ:

• ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, स्प्रेअर्स इ. यंत्रसामग्री

2) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (समूह आधारित)
लाभ:

• पॉलीहाऊस, शेडनेट, प्लॅस्टिक मल्चिंग
• प्राथमिक प्रक्रिया केंद्र, नर्सरी
• कांदाचाळ, रेफर व्हॅन इत्यादी

महाडीबीटी पोर्टलवर योजना निवडताना आपल्या भूप्रदेश, पीक, आर्थिक व सामाजिक वर्गीकरण या आधारावर योजना लागू होतात.
योजना अर्ज करण्यासाठी:
https://mahadbt.maharashtra.gov.in
नोंदणी करताना आधार, 7/12 उतारा, बँक पासबुक, फोटो व योजना संबंधित माहिती आवश्य आहे.mahadbt-yojana

हे पण वाचा : खरीप हंगामात ११.७० लाख हेक्टरवर पेरणी; सर्वाधिक पेरणी कोणत्या पिकाची?

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top