maharashtra-weather-alert: राज्यात पुढील ४-५ दिवस मिश्र हवामान; विदर्भात गारपीट होण्याची शक्यता
maharashtra-weather-alert: राज्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढत असताना, हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस मिश्र प्रकारच्या हवामानाचा इशारा दिला आहे. मुंबईसारख्या किनारपट्टीच्या शहरात जरी तापमान ३४ अंश सेल्सिअसवर स्थिर असले, तरी सतत बदलणारी आर्द्रता मुंबईकरांना सतावते आहे. यामुळे शहरवासीय घामाघूम होत आहेत.
दुसरीकडे, राज्याच्या अंतर्गत भागांत कमाल तापमान झपाट्याने वाढत असून, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात २७ आणि २८ एप्रिल रोजी गारपिटीची शक्यता आहे. त्याच वेळी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेसह दमट हवामान राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी हलकासा पाऊस देखील होऊ शकतो. यामुळे काही प्रमाणात गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे, पण ढगाळ वातावरणामुळे उकाडा कायम राहण्याची चिन्हं आहेत.
राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान (अंश सेल्सिअस मध्ये):
मालेगाव ४३.२
उदगीर ४१.८
सातारा ३९.२
जळगाव ४१.५
परभणी ४४.४
नाशिक ३९
नंदुरबार ४३.३
पुणे ४०.२
बारामती ४०.४
सोलापूर ४२.१
बीड ४३.६
जेऊर ४२
अकोला ४५.१
अमरावती ४४.६
बुलढाणा ४०.६
चंद्रपूर ४५.४
गडचिरोली ४३.२
गोंदिया ४२.६
नागपूर ४४
वर्धा ४४.१
वाशिम ४३.४
यवतमाळ ४४.४
तापमानाच्या या आकड्यांवरून स्पष्ट होते की विदर्भात उष्णतेचा कहर आहे. चंद्रपूर, अकोला, अमरावती आणि यवतमाळसारख्या जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंशांच्या आसपास पोहोचले आहे, जे उष्माघातासारख्या आरोग्य समस्यांना निमंत्रण देऊ शकते.maharashtra-weather-alert
काय घ्याल काळजी?
– उन्हात बाहेर पडणे टाळा, विशेषतः दुपारच्या वेळेत.
– भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ घ्या.
– अंग झाकणारे आणि हलक्या रंगाचे कपडे वापरा.
– गरज असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हवामानातील बदलांमुळे आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे शेतकरी बांधवांनी देखील सतर्क राहावे. हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देत योग्य ती पावले उचलल्यास संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते.
हे पण वाचा : शेतीसाठी ‘ही’ सिंचन पद्धत वापरा आणि 90% पाणी बचत करा!