monsoon-alert: मोसमी पावसाला पोषक वातावरण: पुढील ३-४ दिवसांत राज्यातील या भागांत मुसळधार पावसाचा इशारा

monsoon-alert: मोसमी पावसाला पोषक वातावरण: पुढील ३-४ दिवसांत राज्यातील या भागांत मुसळधार पावसाचा इशारा

monsoon-alert: मोसमी पावसाला पोषक वातावरण: पुढील ३-४ दिवसांत राज्यातील या भागांत मुसळधार पावसाचा इशारा

 

monsoon-alert: राज्यात पावसाळ्याचा प्रारंभ होण्याच्या तयारीचा काळ सुरु झाला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, मोसमी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे आणि येत्या ३ ते ४ दिवसांत पाऊस अधिक सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पेरणीला थोडी वाट बघा – कृषि विभागाचा सल्ला
राज्यात १५ जूननंतर मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होईल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असं आवाहन राज्याच्या कृषि विभागाकडून करण्यात आलं आहे. वाफसा स्थिती येईपर्यंत वाट बघणं हे पिकांच्या फायद्याचं ठरणार आहे.

या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज
• दक्षिण व्दीपकल्पीय भारतात विशेषतः कर्नाटकात १२ ते १५ जूनदरम्यान,
• कोकण व गोवा येथे १३ ते १५ जून दरम्यान,
• मध्य महाराष्ट्रात १३ ते १५ जून दरम्यान
मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती वेधशाळेच्या संचालक शुभांगी भुते यांनी सादर केली.

मराठवाडा भागात १२ ते १४ जून दरम्यान काही भागात पावसाची शक्यता असून, १२ जूनपासून वातावरणात मोठा बदल दिसून येईल.

मच्छिमार आणि सर्वसामान्यांसाठी महत्वाचे मार्गदर्शन
मच्छिमार बांधवांनी या कालावधीत समुद्रात जाऊ नये. विजांच्या कडकडाटासह पाऊस, वादळ व समुद्राची स्थिती धोका निर्माण करू शकते.

सुरक्षिततेसाठी महत्वाचे उपाय:
• वीजांचा कडकडाट सुरु असताना झाडांच्या खाली आसरा घेऊ नका
• खुल्या मैदानात काम करणे टाळा
• विजेच्या वेळी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वीज पुरवठा बंद ठेवावा
• ओढा, तलाव, नदी यांसारख्या पाण्याच्या स्त्रोतांपासून दूर राहा
• वीज वहन करणाऱ्या वस्तूंना स्पर्श करू नका

सावध शेतकरी आणि सजग नागरिक यांचा काळजीपूर्वक निर्णयच भविष्य ठरवतो!
हवामान बदलाच्या या काळात आपल्या सुरक्षेला आणि शेतीच्या वेळेवर नियोजनाला प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं आहे. योग्य माहिती, अचू अंदाज आणि वेळेवर उपाययोजना केल्यास आपत्ती टाळता येऊ शकते.monsoon-alert

हे पण वाचा : ‘एआय’च्या जोरावर ऊस शेतीचा नवा अध्याय; १ लाख शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top