monsoon-perni-2025: मान्सून नक्की आलाय का? पेरणीचे नियोजन कधी करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
monsoon-perni-2025: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेल्या मान्सूनने यंदा चक्क १२ दिवस आधीच महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. गेल्या १६ वर्षांत पहिल्यांदाच मे महिन्यातच मान्सून दाखल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यंदाचा मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत दक्षिण कोकणात – म्हणजेच तळकोकणात पोहोचला.
कर्नाटक, गोवा या राज्यांमध्येही पावसाचा जोर जाणवतो आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, गोवा, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे.
पुढील काही दिवस पावसाचे संकेत
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून मुंबई, पुणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की पेरणीसाठी पुरेशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पेरणीची घाई का करू नये?
शेतकऱ्यांनो, मान्सून लवकर दाखल झाला असला तरी त्याचा जोर काहीसा तात्पुरता असू शकतो. कृषी विभागाच्या सूचनेनुसार, किमान ५ जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस होण्याची शक्यता कमी आहे.
२७ मेपासून मान्सूनच्या प्रवासाची गती मंदावणार असून हवामान कोरडे होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पेरणीची घाई केल्यास बी अजून उगवण्याआधीच कोरड्या हवामुळे वाया जाऊ शकते, आणि परिणामी मोठं नुकसान होऊ शकतं.
कृषी विभागाचा इशारा
• फसव्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका.
• आपल्या भागात खरोखरच पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस झाल्यानंतरच पेरणी सुरू करा.
• कोरडवाहू भागांतील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
मान्सून लवकर दाखल झाला असला तरी तो अजून स्थिर नाही. हवामान विभाग व कृषी विभागाच्या अधिकृत सूचनांची वाट पहा.
शेतीच्या यशासाठी संयम आणि योग्य वेळेची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे पेरणी करण्यापूर्वी तुमच्या भागातील पावसाचा सातत्य आणि उपलब्धता याचा बारकाईने अभ्यास करा.monsoon-perni-2025
हे पण वाचा : बियाणे गुणवत्ता, खत साठवणूक व लिंकींगसंदर्भातील तक्रार कृषी विभागाकडे कशी कराल?