niryataksham-aamba: निर्यातक्षम आंबा उत्पादनासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि काळजी

niryataksham-aamba: निर्यातक्षम आंबा उत्पादनासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि काळजी

niryataksham-aamba: निर्यातक्षम आंबा उत्पादनासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि काळजी

 

या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त आणि कालावधी लांबला असल्यामुळे आंबा बागांमध्ये मोहर उशिरा आला. सुरुवातीच्या थंडीमुळे सेटिंग चांगली झाली असली तरी तापमानातील बदलामुळे काही अडचणी निर्माण झाल्या. तरीसुद्धा योग्य नियोजन आणि काळजी घेतल्या निर्यातक्षम आंबा उत्पादन शक्य आहे.

बाग व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे घटक

१. आच्छादन करणे
– जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी आणि मुळांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आच्छादन करणे आवश्यक आहे.
– उसाचे पाचट, सोयाबीनचा भुस्सा किंवा गव्हाचा भुस्सा यासारखे सेंद्रिय आच्छादन प्राधान्य द्यावे. niryataksham-aamba
– वाळवीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी क्लोरपायरिफॉस (३ मि.ली./लिटर) यासारख्या कीटकनाशकाची फवारणी करावी.

२. पाणी व्यवस्थापन
– फळधारणेनंतर ओलावा टिकवणे महत्त्वाचे असते, त्यामुळे ठिबक सिंचनाचा वापर करावा.
– तापमान जास्त असल्यास पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवावे.

३. फळांची विरळणी
– बागेत मोठ्या फळांसोबत नवीन मोहर आणि लहान फळे आढळल्यास त्यांची विरळणी करावी.
– लहान आणि अविकसित फळे मोठ्या फळांच्या वाढीस अडथळा ठरतात, त्यामुळे ती वेळीच काढून टाकावीत.

रोग व कीड नियंत्रण

१. पीक संरक्षणासाठी उपाय
– फळधारणेनंतर रोग व किडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निंबोळी अर्कावर आधारित सेंद्रिय फवारण्या घ्याव्यात.
– फळमाशी नियंत्रणासाठी प्रति एकर ६-८ सापळे लावावेत.
– फळकाढणीच्या तीन आठवडे आधी डेनेग्रीन (१ मि.ली./लिटर) व अझाडिरॅक्टीन (१०,००० पीपीएम, २ मि.ली./लिटर) यांची फवारणी करावी.

२. पोषण व्यवस्थापन
– फळांच्या पोषणासाठी फवारणीद्वारे ०:०:५० (पोटॅशियम सल्फेट १० ग्रॅम/लिटर) व जीए (२० पीपीएम) फवारणी घ्यावी.
– ठिबकद्वारे ०:०:५० (१.५ किलो/एकर) दहा दिवसांच्या अंतराने द्यावे.

वाराप्रतिबंधक उपाय
– आंबा बागेमध्ये वारा प्रतिबंधक झाडे (सदाहरित, उंच वाढणारी) लावावीत.
– गरम वाऱ्यांच्या प्रभावातून फळांचे संरक्षण करण्यासाठी शेडनेटचा वापर करावा.
– पुढील हंगामासाठी येत्या पावसाळ्यात वारा प्रतिबंधक झाडांची लागवड करावी.

यंदाच्या हवामान परिस्थितीमुळे आंबा बागायतदारांना काही अडचणींचा सामना करावा लागत असला तरी योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास निर्यातक्षम आंबा उत्पादन शक्य आहे. आच्छादन, पाणी व्यवस्थापन, पोषण आणि कीड नियंत्रण यावर भर दिल्यास उत्तम प्रतिचा आंबा उत्पादन मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच आवश्यक ती काळजी घ्यावी. niryataksham-aamba

हे पण वाचा : गांडूळ खताचा वापर करा; जमिनीची सुपीकता वाढवा, उत्पादनात भर घाला

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top