paus-pik-kalaji: अवकाळी पावसात पिकांचे संरक्षण कसे कराल? जाणून घ्या प्रभावी उपाय!

paus-pik-kalaji: अवकाळी पावसात पिकांचे संरक्षण कसे कराल? जाणून घ्या प्रभावी उपाय!

paus-pik-kalaji: अवकाळी पावसात पिकांचे संरक्षण कसे कराल? जाणून घ्या प्रभावी उपाय!

 

वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला दिला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि इतर जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे.

हवामानाचा अंदाज आणि चेतावणी:

– ३ एप्रिल रोजी बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता.
– ४ एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्ह्यातही अशाच प्रकारच्या हवामानाचा अंदाज.
– कमाल तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने घटण्याची आणि नंतर हळूहळू वाढण्याची शक्यता.
– बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढल्याने जमिनीतील ओलावा टिकवणे गरजेचे.

पीक व्यवस्थापन:

– गहू: गव्हाची मळणी लवकरात लवकर करावी किंवा काढणी केलेला माल ताडपत्रीने झाकून ठेवावा.
– हळद: काढणी केलेली हळद उघड्यावर साठवू नये, सुरक्षित ठिकाणी ठेवावी.paus-pik-kalaji
– उन्हाळी भुईमूग: तुषार सिंचन करून पाणी व्यवस्थापन करावे आणि रसशोषण करणाऱ्या किडींवर जैविक उपाय करावे.

फळबाग व्यवस्थापन:

– केळी: वाऱ्याचा जोर लक्षात घेऊन झाडांना आधार द्यावा. घडांची लवकर काढणी करावी.
– आंबा: फळांची लवकर काढणी करावी आणि झाडांच्या आळ्यात आच्छादन करावे.
– द्राक्ष: काढणी लवकर पूर्ण करावी आणि छाटणीपूर्व तयारी करावी.

भाजीपाला व्यवस्थापन:

– काढणीस तयार असलेली भाजीपाला पिके (मिरची, वांगे, भेंडी) लवकर काढून घ्यावीत.
– रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक ती फवारणी रावी.

फुलशेती:

– काढणीस तयार असलेल्या फुलांची लवकर काढणी करून बाजारात पाठवावी.
– पिके तणविरहित ठेवण्यासाठी वेळेवर खुरपणी करावी.

महत्त्वाचा सल्ला:

शेतकऱ्यांनी हवामानाच्या बदलत्या स्थितीचा विचार करून पिकांची योग्य ती काळजी घ्यावी. मळणी केलेला माल पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी आणि फवारणी करताना हवामानाची स्थिती लक्षात घ्यावी. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा.paus-pik-kalaji

अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसू नये, यासाठी वेळेवर योग्य उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

हे पण वाचा :  केळीबरोबर तिळाची आंतरपीक लागवड करा आणि उत्पन्नात वाढ करा!

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top