pik-vima-nikash: शासनाचे नवे निकष जाहीर: आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला पिक विमा आता नव्या निकषांमुळे अधिक कठीण झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यानंतरही आता अनेक शेतकऱ्यांना पिक विम्याची नुकसानभरपाई मिळणार नाही, अशी धक्कादायक स्थिती निर्माण झाली आहे.
काय आहे नवा निर्णय?
शासनाच्या नव्या निकषांनुसार, जर उभ्या पिकावर वा पीक काढणीनंतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले, तर त्यासाठी विमा कंपन्या नुकसानभरपाई देणार नाहीत. आता फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसानभरपाई देण्याचे निकष लागू होणार आहेत.
नैसर्गिक आपत्तींनी हाहाकार
राज्यात गेल्या काही वर्षांत हवामानामध्ये मोठे बदल झाले आहेत.
• कडक उन्हाळ्यात अचानक ढग जमा होतात आणि पाऊसही पडतो.
• पावसाळ्यात ढगफुटी, अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान होते.
• पीक कापून ठेवल्यानंतरही पावसामुळे धान्य खराब होते.
यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान प्रचंड प्रमाणात वाढले आहे. परंतु, अशा आपत्तींमध्ये सुद्धा आता विमा कंपन्या नुकसानभरपाई देणार नाहीत, हे विशेष चिंतेचे कारण आहे.pik-vima-nikash
पूर्वीचे नियम आता मागे?
केंद्र सरकारच्या पीक विमा योजनेत फक्त कापणी प्रयोगावर आधारित नुकसानभरपाईचा उल्लेख आहे. मात्र राज्य शासनाने यापूर्वी
• प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे,
• हंगामातील आपत्ती,
• काढणी पश्चात नुकसान,
• स्थानिक नैसर्गिक आपत्ती यांचा समावेश करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता.
आता हे निकष मागे घेतले जात आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांची अडचण अधिकच वाढणार आहे.
विमा कंपन्यांचा नफा – शेतकऱ्यांची हानी
२०१६-१७ ते २०२३-२४ या कालावधीत राज्य शासनाने विमा कंपन्यांना ४३,२०१ कोटी रुपये हप्ता दिला. त्यामधून शेतकऱ्यांना ३२,६५८ कोटी नुकसानभरपाई मिळाली. म्हणजेच विमा कंपन्यांनी तब्बल १०,५४३ कोटींचा नफा मिळवला!
एक रुपयाचा पीक विमा योजना बंद
कधीकाळी गाजलेली आणि लाखो शेतकऱ्यांनी लाभ घेतलेली “एक रुपयात पीक विमा” योजना आता बंद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार आता प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या पिकासाठी विम्याची रक्कम भरावी लागणार आहे.
या योजनेतून जास्तीत जास्त शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले होते. मात्र आता स्वतः पैसे भरावे लागल्याने विमा घेणाऱ्यांची संख्या घटणार आहे. यामुळे बोगस दावे टळतील असा विचार शासनाचा असला, तरी खरं नुकसान मात्र गरजू आणि गरीब शेतकऱ्यांचेच होणार आहे.pik-vima-nikash
हे पण वाचा : शेतात गाळ भरताय? कोणता गाळ योग्य आणि कसा वापरावा? जाणून घ्या सविस्तर माहिती!