pm-kisan: PM किसान योजनेचं नवं अपडेट: बंद झालेला हफ्ता पुन्हा मिळणार, फक्त ‘हे’ करा!
pm-kisan: PM Kisan Yojana ही केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणारी महत्त्वाची योजना आहे. लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांचे खातं अनवधानाने किंवा अज्ञानामुळे बंद झाले असून त्यांना पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता मिळालेला नाही.
यामागचं कारण म्हणजे, काही शेतकऱ्यांनी चुकून PM Kisan Portal वरील Voluntary Surrender या पर्यायावर क्लिक केलं होतं. हा पर्याय त्या शेतकऱ्यांसाठी होता, जे या योजनेतून स्वेच्छेने बाहेर पडू इच्छित होते. मात्र चुकीची क्लिक झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे खाते बंद झाले आणि त्यांचा हफ्ता थांबला.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी!
सरकारने याचा विचार करून आता Voluntary Surrender Revocation हा नवा पर्याय पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध करून दिला आहे. यामुळे चुकून खाते बंद झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा आपलं खाते सुरू करता येणार असून त्यांना हप्त्याचा लाभ पुन्हा मिळू शकतो.
खाते पुन्हा सुरू करण्यासाठी काय कराल?
खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा आणि आपलं खाते पुन्हा एकदा सुरू करा:
1. सर्वप्रथम PM Kisan च्या अधिकृत पोर्टलवर जा.
2. Farmers Corner मध्ये जाऊन Voluntary Surrender Revocation या पर्यायावर क्लिक करा.
3. आपला आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाका.
4. Get OTP या पर्यायावर क्लिक करा.
5. आलेला ओटीपी खाली दिलेल्या बॉक्समध्ये टाका आणि Verify OTP वर क्लिक करा.
6. पुढील विंडोवर आपली शेतकरी माहिती दिसेल.
7. त्या विंडोखाली एक स्वयंघोषणापत्र (self-declaration) असेल. त्यावर क्लिक करा.
8. विचारल्यावर, “आपल्याला आपले खाते पुन्हा सुरू करायचे आहे का?” या प्रश्नावर Yes निवडा.
9. Proceed for E-KYC या पर्यायावर क्लिक करा.
10. पुढील विंडोवर अटी व शर्ती (Terms & Conditions) वाचून Submit करा.
11. पुन्हा एकदा आपल्या आधार-लिंक मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो ओटीपी व्हेरिफाय करा.
12. यानंतर, खाते यशस्वीपणे पुन्हा सुरू झाले याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल.
ज्या शेतकऱ्यांनी चुकून Voluntary Surrender निवडलं होतं आणि त्यांचा पीएम किसानचा हफ्ता थांबला होता, त्यांच्या खात्यांची पुनर्स्थापना करण्याची सुवर्णसंधी आता उपलब्ध झाली आहे. PM Kisan Portal वरील नवीन Revocation सुविधा वापरून आपण पुन्हा आपल्या खात्याचा लाभ घेऊ शकता.pm-kisan
हे पण वाचा : द्राक्ष बागेतील करपा रोग नियंत्रण: कारणे, लक्षणे व प्रभावी उपाययोजना