ren-water-harvesting: शेतकऱ्यांनो, रेन वॉटर हार्वेस्टिंग करा आणि या ५ महत्त्वाच्या फायद्यांचा लाभ घ्या!

ren-water-harvesting: शेतकऱ्यांनो, रेन वॉटर हार्वेस्टिंग करा आणि या ५ महत्त्वाच्या फायद्यांचा लाभ घ्या!

ren-water-harvesting: शेतकऱ्यांनो, रेन वॉटर हार्वेस्टिंग करा आणि या ५ महत्त्वाच्या फायद्यांचा लाभ घ्या!

 

मागील भागामध्ये आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचे प्रकार व त्यासाठी लागणाऱ्या प्रमुख घटकांची आवश्यकता याविषयी माहिती घेतली. या भागांमध्ये आपण शेतकरी समुदायाला रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे होणारे प्रमुख फायदे जाणून घेणार आहोत.

रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे होणारे प्रमुख फायदे

1) शेतीसाठी पाण्याचा प्रमुख स्त्रोत:
शेतीसाठी पाण्याचा प्रमुख स्त्रोत म्हणजे विहीर होय. पडलेल्या पावसाचे पाणी बरेच वेळा जमिनीवरून वाहून जाते आणि भूजल पातळी वाढवण्यास मदत होत नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे हे पाणी जलसिंचनाचा एक महत्त्वाचा स्त्रोत बनते.

2) पिकांचे उत्पादन व गुणवत्ता वाढते:
शेतीमध्ये चांगली जमीन व पाण्याची उपलब्धता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढते आणि पिकांना योग्य वेळी संरक्षित पाणी देता येते. यामुळे पिकांचे उत्पादन व गुणवत्ता दोन्ही वाढतात.ren-water-harvesting

3) जमिनीची धूप टाळते:
पावसाळ्यात हस्त नक्षत्राच्या जोरदार पावसामुळे जर शेताची बांधबंदिस्ती व्यवस्थित नसेल तर मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. यामुळे सुपीक मातीदेखील वाहून जाते. योग्य पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास शेतातून वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीची धूप थांबवता येते आणि सुपीकता कायम ठेवता येते.

4) पशुपालनास मदत होते:
बहुतांश शेतकरी शेतीसोबत पशुपालन करतात. उन्हाळ्यात मराठवाडा, विदर्भ यांसारख्या भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवते. जर शेतकऱ्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून आपल्या विहिरी किंवा बोरवेलचे पुनर्भरण केले असेल तर उन्हाळ्यातही पाण्याची उपलब्धता राहते आणि पशुधनासाठी चारा व पाणी मिळते.

5) कमी खर्चात प्रभावी उपाय:
रेन वॉटर हार्वेस्टिंग ही एक सोपी प्रणाली आहे. यासाठी सुरुवातीचा खर्च व देखभाल खर्च कमी असतो. शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच ही व्यवस्था करून घ्यावी, जेणेकरून पावसाळ्यात त्याचा योग्य फायदा होईल.ren-water-harvesting

रेन वॉटर हार्वेस्टिंग ही शाश्वत शेतीसाठी उपयुक्त प्रणाली आहे. यामुळे पाण्याची बचत होते, जमिनीची सुपीकता टिकते, पिकांचे उत्पादन वाढते आणि पशुपालनासही मदत मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करून भविष्यातील पाणीटंचाईवर मात रावी.

हे पण वाचा : हळदीच्या बियांना जास्त काळ टिकवण्यासाठी प्रभावी साठवण उपाय! वाचा सविस्तर

विशेष जाहिराती

नवीन सर्व