shakti-cyclone-alert: ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा; पुढील तीन दिवस या भागांत मुसळधार पावसाची शक्यता

shakti-cyclone-alert: 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; पुढील तीन दिवस या भागांत मुसळधार पावसाची शक्यता

shakti-cyclone-alert: ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा; पुढील तीन दिवस या भागांत मुसळधार पावसाची शक्यता

 

shakti-cyclone-alert: भारताच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात लवकरच एक मोठं चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य चक्रीवादळाचे नाव ‘शक्ती’ असे ठेवले जाणार आहे. हे चक्रीवादळ २३ मे ते २८ मे दरम्यान अत्यंत वेगाने विकसित होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे भारताच्या अनेक भागांवर याचा परिणाम होऊ शकतो.

नैऋत्य मान्सूनची चाहूल
बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भाग, अंदमान समुद्राचा दक्षिण भाग, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राच्या उत्तर भागातून नैऋत्य मान्सून दाखल झाला आहे. यामुळेच पुढील काही दिवसांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

१६ ते १८ मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र
१६ ते १८ मे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, जे पुढे जाऊन चक्रीवादळाचे रूप धारण करू शकते. हवामान तज्ज्ञांच्या मते, हे चक्रीवादळ किनारी भागांवर परिणाम करत मुसळधार पावसाला कारणीभूत ठरू शकते.

कोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता?
कर्नाटक
हवामान विभागाने १६ मेपर्यंत कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. येथे मान्सूनपूर्व सरी पडण्याची शक्यता असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.shakti-cyclone-alert

कोलकाता
पुढील २४ तासांत कोलकात्यात संध्याकाळी गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाच्या दृष्टीने खबरदारी घेणे आवश्यक आहे.

इतर राज्यांमध्ये:
१३ आणि १४ मे दरम्यान पुढील भागांमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे:

• गुजरात
• कोकण आणि गोवा
• मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा
• छत्तीसगड
• पश्चिम बंगाल आणि सिक्कीम
• अंतर्गत कर्नाटक
• तामिळनाडू, झारखंड, केरळ
• पुद्दुचेरी, कराईकल
• रायलसीमा आणि आंध्र प्रदेशातील किनारी भाग
• यानम

नागरिकांसाठी सूचना:
• हवामान बदलाचा परिणाम वाहतुकीवर आणि दैनंदिन जीवनावर होऊ शतो.
• किनारी भागांतील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
• शेतीसाठीही हा काळ महत्त्वाचा असल्याने शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अपडेट्सकडे लक्ष ठेवावे.

हे पण वाचा : यंदाही तुरीचे भरघोस उत्पादन हवे आहे? गोदावरी पद्धतीच्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी आधी समजून घ्या!

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top