soyabean-perani: सोयाबीन उत्पादन वाढवण्यासाठी पेरणीपूर्वी करा ‘या १० महत्त्वाच्या गोष्टी’

soyabean-perani: सोयाबीन उत्पादन वाढवण्यासाठी पेरणीपूर्वी करा ‘या १० महत्त्वाच्या गोष्टी’

soyabean-perani: सोयाबीन उत्पादन वाढवण्यासाठी पेरणीपूर्वी करा ‘या १० महत्त्वाच्या गोष्टी’

 

soyabean-perani: सोयाबीन हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रमुख आणि महत्वाचं नगदी पीक आहे. योग्य नियोजन आणि शास्त्रशुद्ध पद्धती वापरल्यास सोयाबीनचे उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही दुप्पट करता येऊ शकते. खाली दिलेल्या १० गोष्टी पेरणीपूर्वी केल्यास निश्चितच उत्पादनात वाढ होईल.

1️⃣ योग्य जमीन निवड
सोयाबीनची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. मात्र, फारच हलक्या, आम्लयुक्त, क्षारयुक्त, रेताड जमिनीत अपेक्षित उत्पादन येत नाही. मध्यम ते भारी प्रकारची, सेंद्रिय पदार्थयुक्त जमीन उत्तम ठरते.

2️⃣ योग्य पेरणीचा कालावधी
सोयाबीनसाठी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा सर्वोत्तम आहे. पण पेरणी मान्सूनच्या आगमनानंतर, किमान १०० मिमी (२० सें.मी.) पाऊस झाल्यावरच करावी.

3️⃣ खोल नांगरणी करा
दर २-३ वर्षांनी एकदा खोल नांगरणी केल्याने जमिनीचा पोत सुधारतो. जर मागील वर्षी नांगरणी केली नसेल, तर यावर्षी खोल नांगरणी करावी आणि विरुद्ध दिशेने कल्टीव्हेटर चालवून शेत तयार करावे.

4️⃣ सेंद्रिय खत वापरा
शेवटची खुरपणी करण्यापूर्वी शेणखत (१० टन/हेक्टर) किंवा कोंबडी खत (२.५ टन/हेक्टर) मिसळल्याने जमिनीत पोषणतत्त्वे वाढतात व जमिनीचा पोत सुधारतो.

5️⃣ सब-सॉयलरचा वापर करा
सब-सॉयलर यंत्र १० मीटर अंतरावर चालवल्यास जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पीक अधिक काळ टिकून राहते.

6️⃣ योग्य पद्धतीने पेरणी करा
बीबीएफ (Broad Bed Furrow) किंवा रिज-फरी सिस्टीम वापरल्यास अतिवृष्टी, असमान पाऊस यासारख्या समस्या हाताळणे सोपे होते. त्यामुळे बीबीएफ सिस्टीमसाठी आवश्यक यंत्रसामग्रीची पूर्वतयारी करा.

7️⃣ बियाण्याची निवड आणि गुणवत्ता
बियाण्याची उगमशक्ती किमान ७०% हवी. बियाणे शिफारस केलेल्या जातीचे असावे आणि २-३ वेगवेगळ्या कालावधीच्या जाती निवडाव्यात, म्हणजे हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचाव होतो.

8️⃣ निविष्टांची पूर्ण तयारी
बियाणे, रासायनिक आणि सेंद्रिय खते, बुरशीनाशके, कीटकनाशके, तणनाशके इत्यादी सर्व निविष्टांची वेळेत उपलब्धता सुनिश्चित करावी.

9️⃣ घरगुती बियाणे वापरत असल्यास तपासणी आवश्यक
जर मागील वर्षीचे घरगुती बियाणे वापरणार असाल, तर त्याची उगम क्षमता ७०% पेक्षा अधिक आहे का हे तपासा आणि खात्रीशीर असल्यासच वापरा.

🔟 पेरणीचे अंतर आणि प्रमाण
सोयाबीनची पेरणी ओळींमध्ये ४५ सें.मी. अंतरावर आणि रोपांमध्ये ५-७ सें.मी. अंतर ठेवून रावी. बियाणे २-३ से.मी. खोलीवर टाकावे आणि ६५-७० किलो/हेक्टर प्रमाणात बियाण्याचा वापर करावा.

वर दिलेल्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन योग्य नियोजन केले तर सोयाबीनच्या उत्पादनात चांगली वाढ करता येऊ शकते. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक ज्ञान यांचा समन्वय साधून शेतीमध्ये यशस्वी बदल घडवा! soyabean-perani

हे पण वाचा : नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्यात वाढ होणार का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top