कापूस, सोयाबीन, कारली आणि मूग दर: बाजारभावावर दबाव, भवितव्य काय?

कापूस, सोयाबीन, कारली आणि मूग दर: बाजारभावावर दबाव, भवितव्य काय?

कापूस, सोयाबीन, कारली आणि मूग दर: बाजारभावावर दबाव, भवितव्य काय?

 

सोयाबीनमध्ये चढ उतार
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार कायम आहेत. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १०.५५ डॉलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयापेंडचे वायदे ३०८ डॉलर प्रतिटनांवर होते. देशात मात्र सोयाबीनचा बाजार मंदीतच आहेत. शिवाय मोठे चढ उतारही दिसत नाहीत.

देशातील सोयाबीनची भावपातळी आजही ३ हजार ८०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होती. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ३५० ते ४ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान होते. देशातील बाजारात सोयाबीनची आवक चांगली आहे. ही आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

 

मुगाचा बाजार दबावात
देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे. मात्र यंदा देशात मुगाचे उत्पादन आणि आयात वाढली आहे. त्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. मुगाला उठाव असला तरी भावपातळी आजही हमीभावापेक्षा कमीच दिसत आहे.
देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

 

कारल्याला चांगला उठाव
राज्यातील बाजारात सध्या कारल्याला चांगला उठाव मिळत आहे. बाजारातील कारल्याची आवक कमी आहे. बाजारातील इतर भाजीपाल्याच्या दराचाही आधार कारल्याला मिळत आहे. कमी आवक आणि चांगल्या मागणीमुळे कारल्याला भावही चांगला आहे.
सध्या बाजारात कारली प्रतिक्विंटल ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले गेले. कारल्याची आवक यापुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

 

आल्याचे भाव दबावातच
आल्याचे बाजारभाव मागील काही दिवसांपासून आणखी दबावात आले आहेत. नव्या मालाची आवक सुरु झाल्यानंतर दर कमी झाले आहेत. यंदा राज्यात आले पिकाचे क्षेत्र वाढले होते. त्यामुळे आले उत्पादनात यंदा वाढ होईल, असा अंदाज आधिपासून व्यक्त केला जात होता. त्यानुसार बाजारातील आवक वाढल्यानंतर दरावर दबाव वाढत गेला.
सध्या आल्याला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ५ हजारांचा भाव मिळत आहे. बाजारातील आवकेचा दबाव आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आल्याच्या भावावरील दबाव काही आठवडे कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

 

कापूस स्थिरावला
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. मात्र देशातील बाजारात भावापातळी स्थिर दिसत आहेत. आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव काहीसे सुधारून ६८ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा देशातील दरावरही दबाव येत आहे.

तसेच आवकही चांगली सुरु आहे. त्याचाही दरावर दबाव येत आहे. त्यामुळे भावपातळी काहीशी सुधारलेली दिसत आहे. आजही देशातील बाजारात सध्या कापसाला सरासरी ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव होता. तर सरकी ३ हजार ४०० ते ३ हजार ६०० रुपायंच्या दरम्यान विकली जात आहे. कापसाच्या भावात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

हे पण वाचा :लसणाचे दर झेपावले; कापूस, सोयाबीन, मूग, गवारच्या दरांमध्ये काय बदल?

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top