soybean-top-varieties: यंदाच्या खरीपासाठी सोयाबीनच्या टॉप १० उच्च उत्पादक जाती – जाणून घ्या सविस्तर माहिती

 soybean-top-varieties: यंदाच्या खरीपासाठी सोयाबीनच्या टॉप १० उच्च उत्पादक जाती – जाणून घ्या सविस्तर माहिती

 soybean-top-varieties: यंदाच्या खरीपासाठी सोयाबीनच्या टॉप १० उच्च उत्पादक जाती – जाणून घ्या सविस्तर माहिती

 

soybean-top-varieties: खरीप हंगाम जवळ येत असताना शेतकऱ्यांसाठी सोयाबीन हे एक अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक ठरते. अधिक उत्पादन, रोगप्रतिबंधक क्षमता आणि वातावरणाशी सुसंगततेनुसार योग्य वाणाची निवड करणे आवश्यक असते. याच उद्देशाने महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केलेल्या टॉप १० सोयाबीनच्या सुधारित जातींबाबत सविस्तर माहिती येथे दिली आहे.

१) MACS 1460
• परिपक्वता कालावधी: 89–91 दिवस

• फुलांचा रंग: पांढरा

• उत्पादन क्षमता: 22–38 क्विं./हे

• विशेषता: शेंगा फुटण्यास प्रतिरोधक, विविध किडी व रोगांना मध्यम प्रतिबंधक

• योग्य क्षेत्र: मध्य व पश्चिम महाराष्ट्र

२) MACS 1520
• कालावधी: 100 दिवस

• फुलांचा रंग: जांभळा

• उत्पादन क्षमता: 21–29 क्विं./हे

• विशेषता: प्रकाश व उष्णतेस असंवेदनशील, शेंगा फुटण्यास प्रतिरोधक

• योग्य क्षेत्र: मराठवाडा व विदर्भ

३) MACS NRC 1667
• कालावधी: 96–98 दिवस

• फुलांचा रंग: जांभळा

• उत्पादन क्षमता: 20–21 क्विं./हे

• विशेषता: KTI मुक्त वाण, खाद्य व पशुखाद्य उद्योगासाठी उपयुक्त

• योग्य क्षेत्र: पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण भारत

४) KDS 992 (फुले दूर्वा)
• कालावधी: 100–105 दिवस

• फुलांचा रंग: जांभळा

• उत्पादन क्षमता: 25–30 क्विं./हे

• विशेषता: तांबेरा रोगास प्रतिबंधक

• योग्य क्षेत्र: दक्षिण महाराष्ट्र

५) KDS 753 (फुले किमया)
• कालावधी: 100–105 दिवस

• फुलांचा रंग: जांभळा

• उत्पादन क्षमता: 25–30 क्विं./हे

• विशेषता: तांबेरा रोगास प्रतिबंधक

• योग्य क्षेत्र: दक्षिण महाराष्ट्र

६) MACS 1188
• कालावधी: 105–110 दिवस

• फुलांचा रंग: पांढरा

• उत्पादन क्षमता: 25–35 क्विं./हे

• विशेषता: शेंगा फुटण्यास प्रतिरोधक, किडी व रोगांना मध्यम प्रतिबंधक

• योग्य क्षेत्र: पश्चिम व मध्य महाराष्ट्र

७) MAUS 612
• कालावधी: 93–98 दिवस

• फुलांचा रंग: जांभळा

• उत्पादन क्षमता: 32–35 क्विं./हे

• विशेषता: रोग व किडींना प्रतिकारक, शेंगा फुटण्यास प्रतिबंधक

• योग्य क्षेत्र: विदर्भ व मराठवाडा

८) MAUS 725
• कालावधी: 100–105 दिवस

• फुलांचा रंग: जांभळा

• उत्पादन क्षमता: 25–31.5 क्विं./हे

• विशेषता: शेंगामध्ये चार दाण्यांचे प्रमाण अधिक

• योग्य क्षेत्र: मराठवाडा व विदर्भ

९) PDKV Amba (AMS 200-39)
• कालावधी: 114–116 दिवस

• फुलांचा रंग: जांभळा

• उत्पादन क्षमता: 28–30 क्विं./हे

• विशेषता: मुळकुज व खोडकुजास मध्यम प्रतिकारक, लेग-हीमोग्लोबिनचे प्रमाण जास्त

• योग्य क्षेत्र: विदर्भ व मराठवाडा

१०) AMS 2009 (PDKV Yellow Gold)
• कालावधी: 95–100 दिवस

• फुलांचा रंग: जांभळा

• उत्पादन क्षमता: 22–26 क्विं./हे

• विशेषता: पिवळा मोडॉक, मुळकुज, खोडकुज यांस मध्यम प्रतिकारक

• योग्य क्षेत्र: विदर्भ व मराठवाडा

सोयाबीनच्या योग्य जातींची निवड ही यशस्वी उत्पादनासाठी पहिलं पाऊल आहे. स्थानि हवामान, रोगांचा प्रादुर्भाव आणि जमिनीचा प्रकार यानुसार योग्य वाण निवडल्यास उत्पादनात नक्कीच वाढ होईल. शेतकऱ्यांनी वरील माहितीनुसार खरीप हंगामासाठी योग्य वाणांची निवड करून चांगले उत्पादन साध्य करावे. soybean-top-varieties

हे पण वाचा : आज पुन्हा गारपिटीचा इशारा: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वळीवांची शक्यता

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top