sugarcane disease: ऊस पिकावर उन्हाळ्यातील रोगांचा कहर: प्रभावी नियंत्रणासाठी महत्त्वाचे उपाय!
अलीकडे ऊस पिकावर आढळणाऱ्या रोगांची संख्या वाढली आहे. यामागे विविध कारणे जबाबदार आहेत, जसे की एकाच भागात ऊस लागवडीचे वाढलेले क्षेत्र, पीक फेरपालटीचा अभाव, अशुद्ध व निकृष्ट बेण्याचा वापर, तसेच हवामानातील बदल. यामुळे ऊसावरील रोगांचा प्रसार वाढला असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट दिसून येत आहे.
उसावरील प्रमुख रोग आणि त्यांची लक्षणे
१. मर रोग
कारणे:
– फ्युजॅरियम सॅकॅराय या बुरशीमुळे हा रोग होतो.
– जमिनीतील कांड्या पोखरणाऱ्या अळीमुळे प्रादुर्भाव वाढतो.
– रोगग्रस्त ऊस बेण्याच्या वापरामुळे प्रसार होतो.
लक्षणे:
– ऊसाची शेंड्याकडील पाने निस्तेज होतात व पिवळी पडतात.
– पानांच्या कडा करपतात आणि हळूहळू संपूर्ण ऊस वाळतो.
– वाळलेल्या कांड्यात बुरशीची पांढरी वाढ दिसते.
– ऊस पोकळ व रसहीन बनतो, ज्यामुळे साखर उत्पादन घटते.
नियंत्रण:
– शुद्ध व रोगमुक्त बेणे वापरावे.
– बेण्यास लागणीपूर्वी बुरशीनाशक प्रक्रिया करावी.sugarcane disease
– क्लोरपायरिफॉस (२०% प्रवाही) २ लिटर प्रति एकर ४०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
– रोगग्रस्त ऊस खणून काढावा व त्यावर कार्बेन्डाझिम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे प्रक्रिया करावी.
– खोडवा न घेता द्विदल पीक घेऊन फेरपालट करावी.
२. येलो लीफ डिसीज (येलो लीफ सिंड्रोम)
कारणे:
– येलो लीफ व्हायरस मुळे हा रोग होतो.
– हा विषाणू मावा किडीद्वारे व बेण्याद्वारे पसरतो.
लक्षणे:
– पीक ७-८ महिन्यांचे झाल्यावर लक्षणे दिसतात.
– पानाच्या मध्यशिरेखालून पिवळेपणा दिसतो, जो संपूर्ण पानावर पसरतो.
– पानांच्या कडा लालसर दिसू शकतात.
– ऊसाचा वाढ खुंटतो आणि साखर उत्पादन घटते.
नियंत्रण:
– उती संवर्धित रोपांचा वापर करावा.
– रोगग्रस्त बेणे टाळावे.
– मावा किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड ०.३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
उन्हाळा हंगामातील प्रतिबंधात्मक उपाय:
– ऊस लागवडीसाठी निचरायुक्त जमिनी निवडाव्यात.
– चांगली पूर्वमशागत करावी आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवावे.
– पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.
– रुंद सरी किंवा पट्टा पद्धतीने लागवड करावी.sugarcane disease
– बेण्यास कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर व इमिडाक्लोप्रीड (७०%) ३६ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात प्रक्रिया करावी.
– तणनियंत्रण, बाळबांधणी आणि योग्य आंतरमशागत करावी.
– जैविक आणि अजैविक ताण सहन करण्यासाठी कायटोसानयुक्त व सिलिकॉनयुक्त घटकांचा वापर करावा.
उसावरील रोगांचे प्रभावी व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी रोगग्रस्त बेण्याचा वापर टाळणे, योग्य पद्धतीने लागवड करणे आणि वेळेवर नियंत्रण उपाय अवलंबणे गरजेचे आहे. यामुळे उसाचे उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येईल.
हे पण वाचा : वर्ग २ जमिनींसाठी सरकारचा मोठा निर्णय – शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?