tapman-vadh-alert: राज्यात वाढणार उन्हाचा तडाखा: उष्णतेची तीव्रता वाढण्याचा इशारा

tapman-vadh-alert: राज्यात वाढणार उन्हाचा तडाखा: उष्णतेची तीव्रता वाढण्याचा इशारा

tapman-vadh-alert: राज्यात वाढणार उन्हाचा तडाखा: उष्णतेची तीव्रता वाढण्याचा इशारा

 

राज्यावरील वादळी पावसाचे ढग निवळणार असल्याने कमाल तापमानात पुन्हा वाढ होणार आहे. आज (ता. ६) कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान स्थिती आणि अंदाज
मध्य प्रदेश आणि परिसरावरील चक्राकार वारे वाहत असून, उत्तर महाराष्ट्रापासून उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान कायम आहे. शनिवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही विजांसह वादळी पावसाने हजेरी लावली आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उकाडा कायम आहे.

तापमान स्थिती
शनिवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे उच्चांकी ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यवतमाळ, धुळे, मालेगाव आणि अमरावती येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. हवामान विभागाने उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह माल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे.tapman-vadh-alert

प्रमुख शहरांचे तापमान नोंद (अंश सेल्सिअस)
पुणे – कमाल ३६.२, किमान १७.४
धुळे – कमाल ३८.५, किमान १७.०
जळगाव – कमाल ३७.८, किमान २१.५
कोल्हापूर – कमाल ३४.३, किमान २३.६
महाबळेश्वर – कमाल २८.५, किमान १८.०
नाशिक – कमाल ३७.५, किमान १७.६
सातारा – कमाल ३५.७, किमान २०.०
सांगली – कमाल ३५.४, किमान २२.६
सोलापूर – कमाल ३७.४, किमान २५.१
मुंबई (सांताक्रूझ) – कमाल ३३.७, किमान २३.७
डहाणू – कमाल ३४.२, किमान २१.४
रत्नागिरी – कमाल ३३.७, किमान २४.७
संभाजीनगर – कमाल ३६.८, किमान १९.८
परभणी – कमाल ३५.६, किमान २२.४
अकोला – कमाल ३९.०, किमान २१.४
अमरावती – कमाल ३८.०, किमान २१.९
नागपूर – कमाल ३७.४, किमान २०.३
यवतमाळ – कमाल ३८.६, किमान २५.०

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट)
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

३८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे
अकोला – ३९ अंश, यवतमाळ – ३८.६ अंश, धुळे – ३८.५ अंश, मालेगाव – ३८ अंश, अमरावती – ३८ अंश

राज्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी सावध राहावे. उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, हलका आणि आरामदायक पोशाख घालावा, तसेच शक्य असल्यास दुपारच्या उन्हात घराबाहेर जाणे टाळावे.tapman-vadh-alert

हे पण वाचा : एप्रिलमध्ये या भाज्यांची लागवड करून कमी वेळेत जादा नफा मिळवा!

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top