ट्रंप यांच्या निर्णयामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित! – मका आणि सोयाबीन उत्पादकांसाठी दिलासादायक स्थिती

ट्रंप यांच्या निर्णयामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित!
ट्रंप यांच्या निर्णयामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित! – मका आणि सोयाबीन उत्पादकांसाठी दिलासादायक स्थिती

मका आणि सोयाबीन राज्य किंवा केंद्र सरकारच्या निर्णयामुळे नव्हे, तर थेट अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे भारतातील — विशेषतः महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील मका व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना — मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर बदलणाऱ्या व्यापार आणि इंधन धोरणांमुळे भारतातील शेतमालाच्या किमतींमध्ये सकारात्मक घडामोडी घडू शकतात.

जैवइंधनासाठी ट्रम्प यांचा मोठा निर्णय
अमेरिकेचे अध्यक्ष असताना ट्रम्प यांनी ‘रिन्यूएबल फ्युएल स्टँडर्ड 2005’ अंतर्गत जैवइंधन उत्पादन व वापर वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मका, सोयाबीन, पामतेल आणि कृषी अवशेषांपासून इंधन तयार करणे प्रोत्साहित करण्यात आले. इतकेच नव्हे तर पेट्रोलियम कंपन्यांना खनिज इंधनामध्ये बायोफ्युएलचे मिश्रण अनिवार्य करण्यात आले.

सध्या अमेरिकेत बायोइंधनाचे उत्पादन सुमारे २२.२३ अब्ज गॅलन आहे. हे उत्पादन २०२६ पर्यंत २४.०२ अब्ज गॅलन आणि २०२७ पर्यंत २४.४६ अब्ज गॅलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे.

जागतिक उत्पादन आणि भारताची भूमिका
मका उत्पादनात अमेरिकेचा वाटा सुमारे ३२% (३८२० लाख टन) आहे, तर भारत २.८% (३४३ लाख टन) उत्पादनासह सहाव्या क्रमांकावर आहे.
सोयाबीन उत्पादनात अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर असून ११८८.३६ लाख टन उत्पादन करते. भारताचे उत्पादन केवळ १२५ लाख टन असून जागतिक उत्पादनात त्याचा वाटा ३% आहे.

विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ट्रम्प यांचा हा निर्णय संजीवनी ठरू शकतो, कारण मागील दोन वर्षांपासून सोयाबीनचे दर हमीभावापेक्षाही कमी मिळत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत होता. यंदा मात्र जागतिक बाजारात बायोइंधनासाठी मागणी वाढल्यामुळे सोयाबीनच्या किमतीत तेजीची शक्यता निर्माण झाली आहे.

भारतात परिस्थिती कशी बदलली?
इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा वापर वाढल्यामुळे मक्याच्या दरात स्थिरता आली आहे.
मात्र, सोयाबीन रिफायनरीज बंद पडल्या कारण स्वस्त दराने आयात होणाऱ्या तेलामुळे देशांतर्गत गाळप थांबले.
सुमारे ६० लाख टनांहून अधिक सोयाबीन गोदामात साठवलेले आहे, जे विकले गेले नाही.

आव्हाने आणि संधी
GM सोयाबीनच्या आयातीबाबत भारत सरकारवर अमेरिकेचा दबाव आहे.
जीएम (जणुकीय सुधारित) सोयाबीन आयात झाल्यास भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे.
मात्र, अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणावामुळे चीनने अमेरिकन सोयाबीन आयात थांबवली आहे. त्यामुळे इतर देशांसाठी मागणी वाढण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या बायोइंधनविषयक धोरणामुळे जागतिक बाजारात सोयाबीन आणि मका यांची मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा थेट फायदा भारतीय शेतकऱ्यांना – विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना होऊ शकतो. दर वाढल्यास त्यांचे उत्पन्नही वाढेल, आणि काही प्रमाणात मागील नुकसानीची भरपाईही होऊ शकते.

हे पण वाचा : केवळ 200 रुपयांत शेतजमीन मोजणी : शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top