unhali-tomato-lagwad: उन्हाळी टोमॅटो पुनर्लागवडीसाठी महत्त्वाचे उपाय – उत्पादन दुप्पट वाढवा!

unhali-tomato-lagwad: उन्हाळी टोमॅटो पुनर्लागवडीसाठी महत्त्वाचे उपाय – उत्पादन दुप्पट वाढवा!

unhali-tomato-lagwad: उन्हाळी टोमॅटो पुनर्लागवडीसाठी महत्त्वाचे उपाय – उत्पादन दुप्पट वाढवा!

 

उन्हाळी हंगामात टोमॅटोची रोपे २५-३० दिवसांची आणि ८-१० सेमी उंचीची झाल्यावर पुनर्लागवड केली जाते. टोमॅटोची रोपे पुनर्लागवड करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी, जेणेकरून उत्पादन दुप्पट वाढू शकते.

टोमॅटो पुनर्लागवडीसाठी आवश्यक तयारी
– शेतामध्ये सऱ्या पाडून जमिनीच्या उतारानुसार बाफे तयार करून घ्यावेत.
– टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना आठवड्यापूर्वी पाणी देऊन बाफसा स्थिती ठेवावी.
– लागवडीच्या दिवशी वाफ्यांना पुन्हा पाणी द्यावे. वाफ्यांमध्ये पाणी असतानाच ओल्या स्थितीत रोपांची लागवड करावी.
– पुनर्लागवडीपूर्वी रोपवाटिकेमध्ये साधारणतः एक आठवडा अगोदर पाण्याची मात्रा हळूहळू कमी करावी, जेणेकरून रोपे अधिक कणखर होतील.
– लागवडीसाठी वाफ्यातून रोपे काढण्यापूर्वी एक दिवस आधी वाफ्यांना पाणी द्यावे. त्यामुळे रोपांची मुळे न तुटता रोपे सहज निघतात.

योग्य रोपांची निवड आणि पुनर्लागवडीसाठी उपाय
– पुनर्लागवडीसाठी २५ ते ३० दिवसांची, १० ते १५ सेमी उंच आणि ६ ते ८ पाने असलेली रोपे निवडावीत.
– मरगळलेली, इजा झालेली, मुळे कमी असणारी, वाकडे वा पातळ खोड अणारी तसेच रोगट रोपे पुनर्लागवडीसाठी वापरू नयेत.
– पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ४ मि.ली. अधिक मेटॅलेंविडाल एम (३९.८ इएस) ६ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या द्रावणात १०-१५ मिनिटे बुडवून घ्यावीत.unhali-tomato-lagwad
– नर्सरीमधून आणलेल्या रोपांच्या ट्रेमध्येच वरील द्रावणाची आळवणी करावी.
– दोन रोपांत साधारण ३० सेमी आणि सऱ्यांमध्ये ९० सेमी अंतर ठेवून टोमॅटो रोपांची लागवड करावी.
– रोपे लावताना खोडावर दाब देऊ नये, कारण अशा नाजूक खोडांमुळे रोपे दगावण्याची शक्यता असते.

लागवडीनंतर आवश्यक निगा आणि व्यवस्थापन
– लागवडीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे.
– लागवडीनंतर दहा दिवसांनी मेलेल्या रोपांच्या जागी नवीन रोपे लावावीत.unhali-tomato-lagwad
– रब्बी हंगामातील टोमॅटो पीक फुलोरा अवस्थेत असल्यास खुरपणी करून शेत स्वच्छ करावे आणि खताची मात्रा द्यावी.
– टोमॅटो पिकास आधार देण्याचे काम वेळेवर करावे, जेणेकरून उत्पादन अधिक चांगले मिळेल.

टोमॅटो पुनर्लागवडीसाठी योग्य पद्धती अवलंबल्यास उन्हाळी हंगामात चांगले उत्पादन मिळवता येईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते.

हे पण वाचा : PM किसान योजनेत नाव बदलायचं आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top