vanaspati-anudan: औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान; सविस्तर माहिती जाणून घ्या

vanaspati-anudan: औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान; सविस्तर माहिती जाणून घ्या

 vanaspati-anudan: औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान; सविस्तर माहिती जाणून घ्या

 

vanaspati-anudan: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र शासनाच्या नव्या निर्णयानुसार औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना आता अनुदानाचा लाभ मिळणार आहे. हे अनुदान एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत मंजूर करण्यात आले असून, २०२५-२६ या वर्षासाठी तब्बल रु. ४४०.०० लक्ष इतका वार्षिक कृती आराखडा केंद्र शासनाने मंजूर केला आहे.

योजनेची पार्श्वभूमी:
सन २०१५-१६ पासून राज्यात औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी “राष्ट्रीय आयुष अभियान” राबविले जात होते. त्या कालावधीत ८९८.२३ हेक्टर क्षेत्रावर औषधी वनस्पती लागवड झाली असून, रु. ४१५.१२ लक्ष इतके अनुदान वितरित करण्यात आले होते. मात्र, सन २०२१-२२ पासून ही योजना बंद करण्यात आली होती.

आता पुन्हा एकदा कृषी मंत्रालयाकडे हस्तांतरित झालेल्या या योजनेंतर्गत औषधी आणि सुगंधी वनस्पती लागवडीसाठी पुन्हा अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे.

कोणत्या वनस्पतींसाठी मिळणार अनुदान?
1. औषधी वनस्पती
• उदाहरणे: जेष्ठमध, शतावरी, गुग्गुळ, अश्वगंधा, ब्राम्ही, तुलसी, पिंपळी इ.
• अनुदान: रु. 1.50 लाख प्रति हेक्टर
• अर्थसहाय्य: सर्वसाधारण क्षेत्रात 40%, अधिसूचित क्षेत्रात 50%

2. महाग सुगंधी वनस्पती
• उदाहरणे: गुलाब, रोझमेरी, चंदन, जिरेनियम, कॅमोमाइल
• अनुदान: रु. 1.25 लाख प्रति हेक्टर

3. इतर सुगंधी वनस्पती
• उदाहरणे: गवती चहा, सिट्रोनेला, व्हेटिव्हर, गोड तुळस
• अनुदान: रु. 0.50 लाख प्रति हेक्टर

अर्ज प्रक्रिया:
• इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ‘फलोत्पादन’ या घटकाखाली अर्ज करावा.
• लागवड साहित्य आणि IPM/INM खर्चाचे अनुदान २ हप्त्यांमध्ये दिले जाईल.
• अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहाय्यक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

ही योजना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्थैर्य देण्याबरोबरच औषधी व सुगंधी वनस्पतींच्या क्षेत्रात भारताची ताकद वाढवण्यास मदत करेल. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि निसर्गाशी सुसंगत शेतीचा ए नवा अध्याय सुरू करावा. vanaspati-anudan

हे पण वाचा : मनरेगातून जलतारा खड्डा: कुठे, कसा काढावा आणि किती अनुदान मिळते?

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top