उशिरा गहू पेरणी: १५ डिसेंबरपर्यंतची सुधारित तंत्रशास्त्रीय मार्गदर्शक तत्त्वे
उशिरा गहू पेरणी यंदाच्या अनियमित पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रब्बी हंगामाची सुरुवात उशिरा झाली आहे. अशा परिस्थितीत गव्हाची पेरणी नेमकी कशी करावी, कोणते वाण योग्य ठरतात, आणि उशिरामुळे होणारी उत्पादन घट कशी टाळावी—यासाठी कृषी तज्ज्ञांनी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
राज्यातील गव्हाची उत्पादकता कमी का?
महाराष्ट्रात गव्हाची सरासरी उत्पादकता अद्यापही राष्ट्रीय पातळीपेक्षा कमी आहे. त्यामागील काही कारणे असे आहेत:
-
हलकी किंवा मध्यम प्रतीची जमीन
-
पाण्याचा अपुरा पुरवठा
-
इतर फायदेशीर पिकांकडे झुकाव
-
योग्य वाणांची निवड न होणे
-
अपुरी खत मात्रा
-
रोग-कीडांचा प्रादुर्भाव
-
बदलते हवामान
-
१५ डिसेंबरनंतर उशिरा पेरणीमुळे उत्पादनात घट
उशिरा पेरणीमुळे तांबेरा रोगाचा धोका वाढतो आणि प्रत्येक उशिराच्या पंधरवड्याला २.५ क्विंटल/हेक्टरपर्यंत उत्पादन घटते.
जमिनीची निवड आणि पूर्व-मशागत
योग्य जमीन निवड महत्त्वाची:
-
बागायती गव्हासाठी — खोल, भारी, निचरा होणारी जमीन
-
जिरायती गव्हासाठी — भारी जमीन
-
हलक्या जमिनीत गहू टाळणे योग्य
पूर्व मशागत:
-
खरीपानंतर १५–२० सेमी खोल नांगरट
-
हेक्टरी २५–३० गाड्या शेणखत/कंपोस्ट
-
३–४ कुळवाच्या पाळ्या
यामुळे ओलावा साठून राहतो आणि पेरणीसाठी जमीन सुसज्ज होते.
पेरणीची योग्य वेळ आणि सुधारित वाण
पेरणीची शिफारस केलेली वेळ
-
सामान्य परिस्थितीत: नोव्हेंबर पहिला पंधरवडा
-
पाऊस व उशिराचा हंगाम लक्षात घेऊन: १५ डिसेंबरपर्यंत पेरणी शक्य
उशिरा पेरणीसाठी शिफारस केलेली वाणे
समाधान (NIAW-1994)
-
१६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर
-
शरबती गुणवत्तेचा गहू
NIAW-34
-
बागायती उशिरा पेरणीसाठी
-
दाणे सुंदर, चपाती गुणवत्ता उत्तम
-
उत्पादन क्षमता: ३५–४० क्विंटल/हे.
बियाणे प्रमाण, प्रक्रिया आणि पेरणी पद्धती
बियाणे प्रमाण
उशिरा पेरणीसाठी: १२५–१५० किलो/हेक्टर
(२०–२२ लाख रोपे/हे. साध्य करण्यासाठी)
बीज प्रक्रिया
-
थायरम — ३ ग्रॅम/किलो (बुरशी रोगांसाठी)
-
थायामेथोक्झाम — ७.५ मि.लि./किलो (तुडतुडे/खोडमाशी)
-
अझोटोबॅक्टर + पीएसबी — २५ ग्रॅम/किलो
बीज प्रक्रिया केल्याने उगवण चांगली होते आणि रोगांचा धोका कमी होतो.
पेरणी पद्धती
-
उशिरा पेरणी: १८ सेमी ओळींत अंतर
-
वेळेवर पेरणी: २२.५ सेमी अंतर
-
पेरणी खोली: ५–६ सेमी
-
जमिनीत पुरेशी ओल असेल तेव्हा दक्षिणोत्तर ओळी करणे फायदेशीर
खत व्यवस्थापन आणि उत्पादन वाढवण्याचे उपाय
वेळेवर पेरणी (बागायती)
-
१२०:६०:४० NPK किलो/हे.
-
पेरणीवेळी अर्धे नत्र + पूर्ण P आणि K
उशिरा पेरणी
-
८०:४०:४० NPK किलो/हे.
जिरायती गहू
-
पेरणीवेळी ४० किलो नत्र + २० किलो स्फुरद
-
६५–७० दिवसांनी २% युरिया फवारणी → दाणे भरतात
उत्पादन क्षमता:
-
बागायती उशिरा पेरणी — ३५–४० क्विंटल/हे.
-
जिरायती — १२–१५ क्विंटल/हे.
सिंचन आणि तण व्यवस्थापन
सिंचन वेळापत्रक
-
साधारण १८–२१ दिवसांनी पाणी
-
एकूण ४–५ पाण्याच्या पाळ्या पुरेशा
महत्त्वाच्या अवस्था (दिवस)
-
१८–२१ दिवस — मुकुट मुळे
-
४०–४५ दिवस — कांडी धरणे
-
६०–६५ दिवस — फुलोरा
-
८०–८५ दिवस — दाणे भरणे
पाणी कमी असल्यास
-
एकच पाणी → ४०–४२ दिवस
-
दोन पाणी → २०–२२ व ६०–६५ दिवस
-
तीन पाणी → २०–२२, ४०–४२, ६०–६५ दिवस
तण व्यवस्थापन
- १–२ वेळा खुरपणी/कोळपणी
- चांदवेल, हरळी, दुधाणी आदी तणांवर नियंत्रण आवश्यक
हे पण वाचा Weather Update: राज्यात ढगाळ वातावरण; शेतकऱ्यांसाठी सूचना











