कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना दिलासा
CCI कडून नोंदणीची अंतिम तारीख 16 जानेवारी 2026 पर्यंत वाढवली
कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना दिलासा:कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय समोर आला आहे. भारतीय कापूस महामंडळाने (CCI) कापूस विक्रीसाठी आवश्यक असलेली ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 31 डिसेंबर 2025 रोजी बंद न करता थेट 16 जानेवारी 2026 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिलेल्या ग्वाहीद्वारे स्पष्ट करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील हजारो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
नोंदणी मुदतवाढीचा निर्णय का महत्त्वाचा?
याआधी CCI कडून अधिकृत खरेदी केंद्रांवरील नोंदणी प्रक्रिया 31 डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अनेक भागांत कापूस अजूनही शेतात व गोदामात असल्याने हा निर्णय शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवणारा ठरणार होता.
याच पार्श्वभूमीवर कापूस उत्पादकांच्या हितासाठी नोंदणीला 16 दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे.
न्यायालयात काय मांडण्यात आले?
या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात पुढील मुद्दे मांडण्यात आले—
-
विदर्भ व इतर भागांत कापूस टप्प्याटप्प्याने बाजारात येतो
-
आतापर्यंत फक्त सुमारे 30 टक्के कापूस विक्री झाली आहे
-
अजूनही 70 टक्क्यांहून अधिक कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे
नोंदणी वेळेआधी बंद झाल्यास शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात कापूस विकावा लागेल, असा युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयानेही या बाबींची गंभीर दखल घेत CCI च्या आधीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
‘लोकमत’ बातमीमुळे वेळेत हस्तक्षेप
कापूस विक्री नोंदणी बंद करण्याचा निर्णय असल्याची बातमी ‘लोकमत’ वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. हीच बातमी न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात आली. त्यामुळे वेळेत कायदेशीर पावले उचलता आली आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय होण्यास मदत झाली, असे न्यायालयात नमूद करण्यात आले.
पुढील सुनावणी कधी?
-
ही जनहित याचिका अजूनही प्रलंबित आहे
-
पुढील सुनावणी 16 जानेवारी 2026 रोजी होणार आहे
-
याचिकाकर्त्यांनी नोंदणी प्रक्रिया एप्रिल 2026 पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे
धुळे जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी
या प्रकरणात आणखी एक मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे—
-
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे
-
त्या ठिकाणी जिनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरी उपलब्ध असूनही केंद्र सुरू न केल्याचा आरोप
-
न्यायालयाने CCI ला पुढील सुनावणीपर्यंत याबाबत स्पष्ट उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत
शेतकऱ्यांसाठी या निर्णयाचा फायदा काय?
-
नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांना अजून संधी
-
कापूस विक्रीसाठी घाई करण्याची गरज नाही
-
हमीभावावर कापूस विकण्याची शक्यता वाढली
-
खासगी व्यापाऱ्यांकडून होणारा दरदबाव कमी होणार
हे पण वाचा कुसुम सोलार वॉटर पंप योजनेत ऑनलाइन गैरप्रकाराचा संशय












